जिल्हा परिषदेवर आज थाळी-लाटणे मोर्चा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेवर आज थाळी-लाटणे मोर्चा

आशा व गट प्रवर्तक आक्रमक, वेतन थकल्याने अस्वस्थता

अहमदनगर/प्रतिनिधी म आशा व गट प्रवर्तकांना मागील पाच महिन्यापासूनचे वेतन मिळाले नसल्याने तारीख पे तारीख सुरु आहे. त्यामुळे थकीत वेतन मिळण्यासाठी आशा व

कोरोनाच्या काळातही पोलिसांचा खिसा गरमच l पहा LokNews24
आठ वर्षीय तनिषला दुचाकीची धडक
श्रीरामपुरात वाळू तस्करांकडून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर/प्रतिनिधी म आशा व गट प्रवर्तकांना मागील पाच महिन्यापासूनचे वेतन मिळाले नसल्याने तारीख पे तारीख सुरु आहे. त्यामुळे थकीत वेतन मिळण्यासाठी आशा व गट प्रवर्तक सोमवारी (दि.14 फेब्रुवारी) जिल्हा परिषदेवर थाळी-लाटणे घेऊन मोर्चाने धडकणार आहेत. पाच महिन्यापासूनचे वेतन थकल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याने जोपर्यंत मानधनाची थकबाकी मिळत नाही, तोपर्यंत शासनाचे कुठलेही काम करणार नसल्याचा निर्धार आशा व गट प्रवर्तकांनी केला आहे.
आशा व गट प्रवर्तक यांचे सप्टेंबर 2021 पासूनचे थकित मानधन वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊन देखील शासनाने हे मानधन दिलेले नाही. त्यामुळे शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आशा व गट प्रवर्तक संघटनेचे अ‍ॅड. सुधीर टोकेकर व सुरेश पानसरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन केले जाणार आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून आशा सेविका काम करत आहे. शासनाने कोरोना काळात त्यांच्याकडून दहा-दहा तास काम करून घेतले. आशा काम करत असताना त्यांना मानधन प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला देऊ असे संघटनेच्या पदाधिकारी यांना लेखी आश्‍वासन देऊन देखील, शासनाने त्यांचे पाच महिन्यांचे मानधन दिलेले नाही. मध्यंतरीच्या काळात त्यांचे मानधन वाढवून दिले. परंतु फक्त कागदोपत्री, प्रत्यक्ष हातात काहीही पडलेले नाही. शिवाय, नियमित वेतन देखील मिळाले नसल्याने आशा सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जो पर्यंत मानधनाची थकबाकी मिळत नाही, तो पर्यंत शासनाचे कुठलेही काम करणार नसल्याचा निर्धार आशा व गट प्रवर्तकांनी केला आहे. कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक व मानसन्मान नको, तर कुटुंब चालविण्यासाठी थकित वेतन देण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोना काळात सेवा देत असताना पैश्याअभावी चांगले उपचार न मिळाल्याने अनेक आशा सेविका दगावल्या असल्याचेही संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या जिल्हाव्यापी मोर्चात सर्व आशा व गट प्रवर्तकांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुभाष लांडे, विडी कामगार नेते कारभारी उगले, संजय नागरे, आप्पासाहेब वाबळे, जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा थोरात आदींनी केले आहे.

COMMENTS