Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरेंनी चर्चा न करता राजीनामा दिला

खासदार शरद पवारांचे वक्तव्य

मुंबई/प्रतिनिधी ः महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी कुणाशीही चर्चा न करता आपला राजीनामा दिला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँगे्रसचे अध

राफेलवरून मोदी सरकारच्या अडचणीत वाढ !
महाडमधील महिला सरपंचाच्या हत्येचं गूढ उलगडलं | LOKNews24
नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा

मुंबई/प्रतिनिधी ः महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी कुणाशीही चर्चा न करता आपला राजीनामा दिला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. त्यामध्ये जर कुणी राजीनामा देत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांशी त्याबाबत चर्चा करणे आवश्यक होते. चर्चा न करता निर्णय घेतल्याने याचे दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने त्यावेळी ही चर्चा झाली नाही ही वस्तूस्थिती टाळता आली असती, असे सूचक वक्तव्य पवारांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

अदाणी समूहाच्या ‘जेपीसी’ चौकशीवर देखील शरद पवारांनी भूमिका मांडली आहे. विरोधी पक्षातील सहकार्‍याचं वेगळे मत आहे. आम्हाला विरोधी पक्षात ऐक्य ठेवायचे आहे. त्यामुळे सहकारी मित्र पक्षांना ‘जेपीसी’ चौकशी व्हावी वाटत असेल, तर त्याला विरोध करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पवारांनी महाविकास आघाडीतील झालेल्या मतभेदांवर उघड प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ही दोन्ही पदे संख्याबळानुसार तीन पक्षांनी मिळून नियुक्त केली होती. सरकारमध्येतिन्ही पक्षाचा सहभाग होता. त्या संबंधित जर कोणी निर्णय घेऊन राजीनामा देत असेल, तर ता ेत्यांचा अधिकार आहे. पण याबाबत अन्य पक्षांशी चर्चा करणे आवश्यक होते. चर्चा न करता निर्णय घेतल्यान ेदुष्परिणाम होतात. राज्यात फडतूस शब्दावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. मात्र यावरून शरद पवार यांनी सर्वच नेत्यांचे कान टोचले आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, वैयक्तिक टीकाटिप्पणी करु नका, असे पवार यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना सुनावले.

फडतूस-काडतूसवरून टोचले कान- महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपूवी उद्धव ठाकरे यांनी असा फडतूस गृहमंत्री बघितला नसल्याचे वक्तव्य केले होते. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. राजकीय आरोप प्रत्यारोपात फडतूस-काडतूसवरून भाजप-ठाकरे गटात रणकंदन माजले होते. त्यावर पवारांनी नाराजी व्यक्त केली. मला महाराष्ट्राची संस्कृती, येथील लोकांची मानसिकता माहिती आहे. वैयक्तिक हल्ला टाळा, राजकीय मुद्दे घ्या, लोकांचे प्रश्‍न घ्या. वैयक्तिक टीका-टिप्पणी, चिखलफेक होऊ नये. हे टाळण्याचे काम जाणीवपूर्वक केले पाहिजे असे सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचे कान टोचले.

COMMENTS