नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, दिल्लीमध्ये आपण आणि भाजप या दोन्ही पक्षात प्रमुख लढत दिसून येत आहे. मात्र या निवडणुकीत
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, दिल्लीमध्ये आपण आणि भाजप या दोन्ही पक्षात प्रमुख लढत दिसून येत आहे. मात्र या निवडणुकीत आप स्वबळावर लढत असून, काँगे्रस देखील मैदानात असल्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याचे दिसून येत आहे. तृणमूल काँगे्रसच्या ममता बॅनर्जी यांनी आपला पाठिंबा दिल्यानंतर गुरूवारी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देखील आपला पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 जागांसाठी एकाच टप्प्यात पाच फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या वेळी दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीमध्ये एकही जागा मिळाली नव्हती. तर केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पूर्ण बहुमत मिळवले होते. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या संदर्भातील माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्लीच्या निवडणुकीत सपा देखील आपचा प्रचार करणार आहे.
COMMENTS