नवी दिल्ली/प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर शिवसेनेने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धा
नवी दिल्ली/प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर शिवसेनेने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. निवडणूक आयोगाने निर्णय देतांना नैसर्गिक न्यायाचे तत्व पाळले नसल्याचा, आणि आम्हाला आमचे म्हणणे सादर करण्यास संधीच दिली नसल्याचा आरोप केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले की, शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे पालन झाले नाही. केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांनी शनिवारी पक्षाशी संबंधित सर्व गोष्टी मागवल्या. आम्ही शनिवारीच सर्व गोष्टी सादर केल्या. मात्र, आयोगाने आमचे म्हणणे ऐकून न घेता शनिवारी रात्रीच निर्णय दिला. याला भूतकाळातील काही संदर्भ आहेत. आयोगाने आम्हाला एक सुनावणी देण्याची गरज होती आणि विचारणा करण्याची गरज होती. तसे न करता आयोगाने एकतर्फी निर्णय दिला. याबाबतच आम्ही याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण आज पटलावर आले. त्यावर आज किंवा उद्या सुनावणी होईल. सूचीप्रमाणे ही याचिका उद्या सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली. दिल्ली उच्च न्यायालय स्थिगिती देईल का? या प्रश्नाचे उत्तर देताना अनिल देसाई म्हणाले, दिल्ली उच्च न्यायालयासमोर अनेक बाबी आम्ही मांडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातही आम्ही पक्षाच्या घटनेपासून सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेताना घेतलेली घाई निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयात विचार विनिमय होईल.
COMMENTS