Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रभाग रचनेविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग संख्या आधी 227 इतकी होती, पण महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यां

अनुसूचित जातीच्या 50 हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
विकासकामात कोणताही अडथळा येऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग संख्या आधी 227 इतकी होती, पण महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात बदल करून प्रभाग रचना 236 केली. नंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने ही प्रभाग रचना पूर्ववत केली होती. याविरोधात ठाकरे गटाने आधी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने ठाकरे गटाविरोधात निर्णय देत आधीची प्रभागरचना कायम ठेवली. आता ठाकरे गटाचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाकरे गटाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसांत ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. राज्यातील अनेक नगरपरिषदांमधील नगरसेवकांची वाढवलेली संख्या कायम ठेवताना केवळ मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या कमी करण्याचा सरकारचा निर्णय दुजाभाव करणारा असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

COMMENTS