हॉकर्सविरोधात आज कापड बाजारात उपोषण ; विविध संघटनांचा व्यापार्‍यांना पाठिंबा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉकर्सविरोधात आज कापड बाजारात उपोषण ; विविध संघटनांचा व्यापार्‍यांना पाठिंबा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या कापड बाजारातील व आजूबाजूच्या बाजारपेठेतील हॉकर्सच्या अतिक्रमणांविरोधात विविध संघटनांनी व्यापारी महासंघाच्या उपोषणाला पाठि

अंजली महामेर यांना नारीशक्ती साहित्य पुरस्कार प्रदान
राज्यात चांगला पाऊस होऊन शेतकरी सुखी होऊ दे
आत्मा मालिकचे नीट परीक्षेत घवघवीत यश

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या कापड बाजारातील व आजूबाजूच्या बाजारपेठेतील हॉकर्सच्या अतिक्रमणांविरोधात विविध संघटनांनी व्यापारी महासंघाच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व शिवसेनेेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनीही व्यापार्‍यांच्या मागणीला साथ देत त्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, हॉकर्सविरोधात व्यापार्‍यांचे आज मंगळवारपासून (29 मार्च) कापड बाजारात उपोषण आंदोलन सुरू होणार आहे.
शहरातील कापडबाजारासह संपूर्ण बाजारपेठेत अवैधरित्या रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणारे फेरीवाले, हातगाडीवाले यांचा कायमचा बंदोबस्त करून बाजारपेठेचा श्‍वास मोकळा करण्याची मागणी अहमदनगर व्यापारी महासंघाने केली आहे. बाजारपेठेत पुन्हा एकदा हातगाडीवाले पथारी मांडून बसू लागले आहेत. त्यामुळे कडक कारवाईसाठी व्यापारी महासंघाने मंगळवार दि.29 मार्च पासून कापडबाजारात बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. महासंघाच्या या आंदोलनाला सर्वस्तरातून मोठा पाठिंबा मिळत असून अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा पत्र दिल्याची माहिती अध्यक्ष ईश्‍वर बोरा यांनी दिली. हिंदू राष्ट्र सेनेने बाजारपेठेतील व्यापार्‍यांची मागणी योग्य असल्याचे सांगत मनपा आयुक्तांना बाजारपेठ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी निवेदन दिले. यानंतर हिंदू राष्ट्र सेनेने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्‍वर बोरा यांनाही पाठिंबा पत्र दिले आहे. यावेळी घनश्याम बोडखे, परेश खराडे, सागर ठोंबरे, महेश निकम आदी उपस्थित होते. दि अहमदनगर आडते बाजार मर्चंटस असोसिएशननेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी पाठिंबा पत्र दिले आहे. याशिवाय अहमदनगर जिल्हा हॉटेल असोसिएशन, ऑटोमोबाईल असोसिएशन, शहर सराफ सुवर्णकार संघटना, बिल्डिंग मटेरियल असोसिएशन, पैलवान प्रतिष्ठान, तोफखाना मित्र मंडळ, वर्चस्व ग्रुप, अहमदनगर जिल्हा व शहर ड्रग्स अ‍ॅण्ड केमिस्ट असोसिएशन, पंजाबी सेवा समिती, जय आनंद महावीर युवक मंडळ, अहमदनगर रिटेल फूटवेअर मर्चंट असोसिएशन, अहमदनगर मिठाई होलसेल व रिटेल असोसिएशन, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, बजरंग दल, वंदे मातरम युवा प्रतिष्ठान, महापद्म सेना पद्मशाली समाज, जिव्हेश्‍वर युवा मंच सकल साळी समाज, एम.जी.रोड व्यापारी असोसिएशन, सकल राजस्थानी युवा मंच ट्रस्ट, जैन ओसवाल युवक संघ, जिनगर समाज यांच्यासह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, भटके-विमुक्त आघाडी भारतीय जनता पार्टीसह अन्य राजकीय पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असल्याचे बोरा यांनी सांगितले.

मनसे सहभागी होणार
कापड बाजार व बाजारपेठेतील अतिक्रमाणे कायमस्वरुपी हटविण्यात यावी, अन्यथा मनसे मनपा अधिकार्‍यांना कार्यालयात नीट काम करु देणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. मंगळवार दि 29 पासून कापडबाजारातील व्यापार्‍यांसमवेत आंदोलनाला बसण्याचा निर्णयही मनसेने जाहीर केला आहे. कापड बाजारातील फेरीवाल्यांना कायमस्वपी हटविण्यात यावे, या मागणी निवेदन मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना मनसे पदाधिकार्‍यांनी दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर, विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा, तुषार हिरवे, दिपक दांगट, संकेत व्यवहारे, संतोष साळवे, संकेत जरे, प्रकाश गायकवाड, शुभम जरे, विशाल जरे, विनोद काकडे,मनोज राऊत ,परेश पुरोहित, संदीप चोधरी आदि उपस्थित होते.

COMMENTS