Homeताज्या बातम्याविदेश

पेट्रोल पंपावर भीषण स्फोट 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू

रशिया प्रतिनिधी - रशियाच्या दक्षिणेकडील दागेस्तानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी पेट्रोल पंपावर झालेल्या भीषण स्फोटात 30 जणांचा दुर्दै

पुण्यात 200 झोपड्यांवर रेल्वेचा हातोडा
ताडोबा सफारी प्रकल्पाची 12 कोटींची फसवणूक
पाटण-कोयना मार्गावरील अपघातात स्विफ्टचा चक्काचूर, 3 गंभीर जखमी

रशिया प्रतिनिधी – रशियाच्या दक्षिणेकडील दागेस्तानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी पेट्रोल पंपावर झालेल्या भीषण स्फोटात 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. या स्फोटामध्ये 100 हून अधिक जण जखमी झालेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कॅस्पियन समुद्राच्या किनार्‍यावर प्रादेशिक राजधानी मखचकला येथे स्थानिक वेळेनुसार रात्री ९.४० च्या सुमारास पेट्रोल पंपावर भीषण स्फोट झाला. या स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्फोटानंतर पेट्रोल पंपाला भीषण आग लागली. धुराचे लोट आसपासच्या परिसरात पसरलेत. स्फोट झाल्यानंतर पेट्रोल पंपाला लागलेली आग काही क्षणातच ६०० मीटरपर्यंत पसरत गेली. रशियाचे उप आरोग्य मंत्री व्लादिमीर फिसेन्को यांनी सांगितले की, ‘जखमींपैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. इंटरफॅक्सने दागेस्तानी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, जखमींमध्ये 13 मुलांचा समावेश आहे. रशियाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाने टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर सांगितले की,’गंभीर जखमींना मॉस्कोला नेण्यासाठी मखचकला येथे विमान पाठवण्यात आले आहे.’

COMMENTS