जत्रेच्या राईड मध्ये तरुणासोबत झाला भयंकर अपघात.

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

जत्रेच्या राईड मध्ये तरुणासोबत झाला भयंकर अपघात.

जत्रेत जाणे जीवावर बेतलं

गुजरात प्रतिनिधी - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा मेळा आणि जत्रा सुरू झाल्याने लोकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्साहाला मात्र गालबो

Beed : धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा | LOKNews24
2 भावांवर रॉड, लाठ्या-काठ्यांनी जीवघेणे हल्ला; घटना CCTVमध्ये कैद | LOK News 24
धनजंय जाधव शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी

गुजरात प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा मेळा आणि जत्रा सुरू झाल्याने लोकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्साहाला मात्र गालबोट लागलं. जत्रे दरम्यान एक भीषण दुर्घटना घडली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जत्रेचा आनंद घेत असताना एक तरुणासोबत भीषण दुर्घटना घडली आहे. गुजरातच्या सौरराष्ट्र परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे. तरुण मित्रांसोबत ब्रेक डान्स राईडमध्ये जत्रेत सहभागी झाला. तो जत्रेचा आनंद घेत होता. अचानक या तरुणाच्या डोक्याला काहीतरी आपटलं आणि त्यातून रक्त येऊ लागलं. रक्तस्त्राव झाल्याने तरुण बेशुद्ध झाला. या तरुणाला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. नेमका हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अजून समोर आलं नाही.

COMMENTS