बेळगाव : महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये येण्यात कर्नाटक सरकारने बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा

बेळगाव : महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये येण्यात कर्नाटक सरकारने बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. तरी सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते कार्यकर्ते या मेळाव्यासाठी जात होते. मात्र, त्यांना कोल्हापूर पोलिसांनी वाटतेतच अडवले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारची ही मिलीभगत असल्याचा आरोप या वेळी कार्यकर्त्यांनी केला. तसेच गनिमीकावा करत आम्ही बेळगावला जाणारच असा निर्धार देखील यावेळी आंदोलकांनी केला आहे. कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले होते तसेच या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांनाही आमंत्रित केले होते. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या समर्थनासाठी या मेळाव्याला यावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले होते. मात्र, कर्नाटक सरकारने या महामेळाव्यावर बंदी घातली आहे. याशिवाय, महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकात येण्यास बंदी केली आहे.
COMMENTS