Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आक्षेपार्ह व्हीडीओमुळे किल्लारीत तणाव

औसा/किल्लारी प्रतिनिधी - औसा तालुक्यातील तळणी येथील एका युवकाने आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा एक आक्षेपार्ह व्हीडीओ

सफाई कामगाराने घेतली 10 हजाराची लाच
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचा तालुक्यात बोजवारा
सहा दिवसांत पाऊण कोटीची कर वसूली

औसा/किल्लारी प्रतिनिधी – औसा तालुक्यातील तळणी येथील एका युवकाने आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा एक आक्षेपार्ह व्हीडीओ ठेवल्याने तळणी, किल्लारी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या या आक्षेपार्ह व्हीडीओमुळे समाजात भावना दुखावण्याचा व चीड निर्माण करण्याच्या प्रकारामुळे किल्लारी व परिसरात गावात तणाव निर्माण झाला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की आक्षेपार्ह व्हीडीओ ठेवणा-या युवकाविरुध्द किल्लारीतील जनता खवळून उठले होती. किल्लारीतील अनेक संघटना, उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते रत्त्यावर उतरले होते. आक्षेपार्ह पोस्ट करणा-यावर कडक कारवाई करा म्हणून किल्लारी पोलिस ठाण्यात मोठा जमाव एकत्र झाला होता.

COMMENTS