Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस भरतीत हायटेक कॉपी करणारे दहाजण अटकेत

पुणे/प्रतिनिधी ः राज्य राखीव दलाच्या पोलिस शिपाई भरती परीक्षेत ‘हायटेक’ कॉपीबहाद्दरांच्या रॅकेटचा पर्दाफाश पुण्यात रविवारी करण्यात आला. या उमेदवा

आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ ची रिलीज डेट जाहीर !
कोण होणार महापौर? नगरसेवकांना प्रतीक्षा निवडणूक कार्यक्रमाची
राज्यपालांचा गैरसमज झाल असावा : महसूल मंत्री थोरात

पुणे/प्रतिनिधी ः राज्य राखीव दलाच्या पोलिस शिपाई भरती परीक्षेत ‘हायटेक’ कॉपीबहाद्दरांच्या रॅकेटचा पर्दाफाश पुण्यात रविवारी करण्यात आला. या उमेदवारांनी कानात लिंबोळीच्या आकाराचे ब्ल्यूटूथ उपकरण आणि शर्टच्या बटणावर छोटासा स्पाय कॅमेरा लावून कॉपी करण्याचा प्रयत्न केला. परंतु परीक्षेसाठी नियुक्त भरारी पथकाला याची आधीच कुणकुण लागल्याने छत्रपती संभाजीनगरातील 4 उमेदवारांसह एकूण 10 जणांना पोलिसांनी परीक्षा देतानाच रंगेहाथ पकडले आहे. राज्य राखीव दलाने राज्यभरातील सर्व अधिकार्‍यांचे भरारी पथक नेमून या परीक्षेवर देखरेख केली होती. राज्य राखीव दल क्रमांक 19 ची पोलिस शिपाई भरती परीक्षा रविवारी पुण्यातील सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून सुमारे 8500 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. पोलिस, आरोग्य, शिक्षक भरती परीक्षांमधील घोटाळे उघडकीस आले असल्याने राज्य राखीव पोलिस दलाने आधीच तयारी केली होती. गैरव्यवहार करणार्‍या आरोपींचा माग काढून त्यांची यादी तयार केली. त्यातून 100 संशयितांची नावे काढून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. संशयित उमेदवारांची अंगझडती घेण्यात आली. त्यांच्या कानाची पेन्सिल टॉर्चने तपासणी करून चिमट्याने कानातील लिंबोळीच्या आकाराचे ब्ल्यूटूथ उपकरण काढण्यात आले. याप्रकरणी आरोपींवर अहमदनगर येथील राज्य राखीव पोलिस दल गटाचे पोलिस उपनिरीक्षक अजित कुंभार यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी काळ्या रंगाचे शर्ट व बनियन घातले होते. कानाच्या आतील बाजूस बारीक लिंबोळीच्या आकाराचे ब्ल्यूटूथ उपकरण घातले. खिशात एटीएम कार्डसारखे उपकरण ठेवले होते. त्यात एक सिमकार्ड बसवले होते ते ब्लूटूथशी कनेक्ट होते. शर्टच्या बटणावर स्पाय कॅमेरा लावलेला होता. ब्ल्यूटूथ उपकरण सहजासहजी कुणाला दिसत नाही. प्रश्‍नपत्रिका हातात पडताच स्पाय कॅमेर्‍याने पेपरचे स्कॅन करून ते फोटो ऑटोमॅटिकली परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या साथीदारांकडे ई-मेलवर जात होते. त्यानंतर इतर साथीदार प्रश्‍नांची उत्तरे शोधून लगेच संबंधित परीक्षार्थींना ब्ल्यूटूथवर पटापट उत्तरे सांगत होते. परीक्षार्थी योग्य उत्तरांवर खुणा करून ते ओआरएम शीट फाडून टाकत होते. हे सर्व करताना परीक्षा केंद्राबाहेर ठेवलेल्या बॅगेतील मोबाइल फोनही सुरूच ठेवले जात होते. उमेदवार परीक्षा देत असताना प्रीतम गुसिंगे, अर्जुन राजपूत, अण्णा व इतर बाहेर घुटमळत होते. त्यांच्याकडेही एक सिमकार्ड, मोबाइल, जीएसएम बॉक्स, कॅप, कानात बसणारे उपकरण होते. अर्जुन हा त्याच्याकडील साहित्याच्या आधारे प्रश्‍नांची उत्तरे देणार होता. विशेष म्हणजे डिजिटल उपकरणे वापरण्यास बंदी असूनही उमेदवारांनी हे उद्योग केले. आरोपी योगेश रामसिंग गुसिंगे (19, रा. बोरसर, ता. वैजापूर,), सागर संजय सुलाने (19, रा. गोकुळवाडी, ता. गंगापूर, संभाजीनगर), योगेश सूर्यभान जाधव (25, रा. शिवगड तांडा, ता. पैठण,), लखन उदलसिंग नायमने (21, रा. काद्राबाद, सर्व जिल्हा छत्रपती संभाजीनगर) आरोपींचे साथीदार : प्रीतम गुसिंगे, अर्जुन राजपूत, अण्णा व इतर. भरारी पथकाने एकूण 10 जणांना अटक केली.

COMMENTS