Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आकाशाला गवसणी घालण्याची संधी : नांदेडच्या 10 विद्यार्थ्यांची ‘इस्त्रो’ अभ्यास दौर्यासाठी निवड

नांदेड । प्रतिनिधीस्वप्ने पाहण्याची हिम्मत आणि त्यांना सत्यात उतरवण्याची जिद्द असेल, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही अंतराळ विज्ञानाच्या दालनापर्य

इस्रो पुढील महिन्यात घेणार सूर्याकडे झेप
इस्रोची आणखी एक मोठी कामगिरी
इस्त्रोचा नवा विक्रम

नांदेड । प्रतिनिधी
स्वप्ने पाहण्याची हिम्मत आणि त्यांना सत्यात उतरवण्याची जिद्द असेल, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही अंतराळ विज्ञानाच्या दालनापर्यंत पोहोचू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणार्‍या खाजगी अनुदानित विजाभज आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था – ‘इस्त्रो’ येथे विशेष अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला असून, या दौर्‍यासाठी नांदेड जिल्ह्यातील तब्बल 10 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
बेंगलूरु, तिरुवनंतपुरम आणि कन्याकुमारी या देशाच्या वैज्ञानिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी 15 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हा अभ्यास दौरा होणार आहे. राज्यभरातून घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील तीन आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत स्थान मिळवले आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातीतील या विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव केवळ शैक्षणिक नसून त्यांच्या भविष्यास दिशा देणारा ठरणार आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा अभिमानास्पद गौरव स्व. संगीता देवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा, दहेली तांडा (ता. किनवट) येथील कु. संजीवनी शिवाजी चव्हाण यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. म. फुले मा. व. उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वाघाळा (ता. नांदेड) येथील चि. जाधव अमेय प्रेम आणि चि. हेळगिरे दत्ता बालाजी यांचीही निवड झाली आहे. विद्यानिकेतन (पब्लिक स्कूल), कमळेवाडी (ता. मुखेड) येथील चि. आयुष अशोक पोफाळे, चि. करणराम किशन चौगुले, कु. कालेकर आश्विनी निवृत्ती, कु. निकिता धोंडिबा केंद्रे, कु. दुर्गा दत्ता खांडरे, कु. दिक्षा जीवन चव्हाण आणि चि. राहुल संभाजी शिरसाट या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. ‘इस्त्रो’सारख्या जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देणे ही कोणत्याही विद्यार्थ्यासाठी प्रेरणेची मोठी संधी असते. अंतराळ तंत्रज्ञान, उपग्रह निर्मिती, रॉकेट विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाची प्रत्यक्ष झलक विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. वर्गखोलीत शिकलेले विज्ञान आणि प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील संशोधन यामधील दुवा या दौर्यातून स्पष्ट होणार आहे. विज्ञान केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून ते कल्पनांना पंख देणारी शक्ती आहे, हे विद्यार्थ्यांना अनुभवातून जाणवणार आहे. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक संदेश ग्रामीण आणि सामाजिकदृष्ट्या मागास पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनीही कठोर मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील संधी मिळवू शकतात, हे या निवडीने सिद्ध केले आहे. अभ्यासात प्रामाणिकपणा, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस असेल तर यश नक्कीच मिळते, हा संदेश या विद्यार्थ्यांच्या यशातून इतरांपर्यंत पोहोचतो. आजचा हा अभ्यास दौरा भविष्यातील शास्त्रज्ञ, अभियंते, संशोधक आणि समाजाभिमुख नागरिक घडविण्याची बीजे रोवणारा ठरणार आहे. विज्ञानाच्या दिशेने उचललेले हे पाऊल अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे. जिल्ह्याचा अभिमान, भविष्यातील आशा या यशाबद्दल विद्यार्थ्यांवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, नांदेड जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद मानली जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला योग्य संधी मिळाल्यास तेही आकाश गाठू शकतात, याची ही जिवंत साक्ष आहे.

COMMENTS