नाशिक प्रतिनिधी - बागायतदारांकडून २५ लाख रुपयांची द्राक्षे ताब्यात घेऊन त्याचा मोबदला न देताच जयपूर येथील व्यापाऱ्याने पळ काढल्याची घटना घडली.
नाशिक प्रतिनिधी – बागायतदारांकडून २५ लाख रुपयांची द्राक्षे ताब्यात घेऊन त्याचा मोबदला न देताच जयपूर येथील व्यापाऱ्याने पळ काढल्याची घटना घडली. या प्रकरणी बागायतदारांनी पिंपळगाव पोलिस ठाण्यात अर्ज दिला असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. लखन चौधरी (रा. जयपूर) असे पळून गेलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे चांदवड तालुक्यातील शरद शिवाजी उशीर, रामदास शंकर जाधव, चंदन दशरथ जाधव विवेक गोपीनाथ जाधव
बाळासाहेब त्र्यंबक शिंदे,ज्ञानेश्वर बाबाजी जाधव, तर निफाड तालुक्यातील मिलिंद काशीनाथ निफाडे, ज्ञानेश्वर शंकर थेटे, नामदेव लक्ष्मण चव्हाण, शांताराम प्रभाकर घोरपडे, किरण रामचंद्र खैरे विलास बारकू शेळके या शेतकऱ्यांचा सुरुवातीला विश्वास। संपादन करून संबंधित। व्यापाऱ्याने जवळपास २५ लाखांची द्राक्षे ताब्यात घेतली. मात्र, द्राक्षांचे पैसे किंवा धनादेश न देताच पळ काढला. तक्रारदारांनी संशयिताचा शोध घेऊनही तो सापडला नाही. यामुळे त्यांनी पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी फिर्याद दिली. संबंधित व्यापारी पाचोरे वणी परिसरात राहात होता. कित्येक वर्षापासून व्यापारी द्राक्ष उत्पादकांना गंडा घालत आहेत. व्यापारी परप्रांतीय असल्याने आजपर्यंत त्यांना आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
COMMENTS