Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसीलदार व नायब तहसीलदार संपावर

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अमरावती प्रतिनिधी - आज पासून राज्यातील  तहसीलदार व नायब तहसीलदार बेमुदत संपावर गेले आहेत, यात अमरावती जिल्ह्यातील 72 तहसीलदार व नायबतहसीलदार स

कठोर कायद्याने अत्याचार थांबेल का ?
उद्धव ठाकरे हे देशाचे नेते… नेतृत्व करण्याचीही क्षमता… राऊतांची स्तुतीसुमने…
Sangamner : खड्ड्यांमध्ये शिवप्रतिष्ठाणचे वृक्षलागवड आंदोलन

अमरावती प्रतिनिधी – आज पासून राज्यातील  तहसीलदार व नायब तहसीलदार बेमुदत संपावर गेले आहेत, यात अमरावती जिल्ह्यातील 72 तहसीलदार व नायबतहसीलदार संपात सहभागी झाले आहेत, राजपत्रित 4 हजार 800 रुपये ग्रेट पे मिळण्याची एकमेव त्यांची मागणी आहे, सर्व तहसीलदार व नायब तहसीलदारांनी यांच्या संपामुळे मात्र शासकीय काम प्रभावित झाले आहेत. तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या संपामुळे मात्र अमरावती जिल्ह्यातील चौदाही तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे, तहसीलदारांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र फटका बसला आहे तर केवळ नैसर्गिक आपत्ती व कायदा व सुव्यवस्था संदर्भात कामे करू व इतर कामे करणार नाही अशी माहिती तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष वैभव फरतारे यांनी दिली. 

COMMENTS