Homeताज्या बातम्यादेश

तिस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला

तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे उच्च न्यायालयाचा आदेश

अहमदाबाद/वृत्तसंस्था ः गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड  यांचा जामीन उच्

जलद गाडयांना पुणतांबा स्थानकावर थांबा मिळावा
संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल
वैष्णोदेवीच्या मार्गावर दरड कोसळून 2 महिलांचा मृत्यू

अहमदाबाद/वृत्तसंस्था ः गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड  यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. हा जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती निरझर देसाई यांनी तीस्ता यांना ’तात्काळ आत्मसमर्पण’ करण्यास सांगितले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना 2002 च्या गुजरात दंगलीच्या प्रकरणात क्लीन चिट दिल्यानंतर सेटलवाड यांच्याविरोधात पुरावे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नरेंद्र मोदींना बदनाम करण्याच्या आणि या प्रकरणात त्यांना गोवण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केल्याचा सेटलवाड यांच्यावर आरोप आहे. या प्रकणी एफआयआर नोंदवल्यानंतर गुजरात पोलिसांनी 25 जून 2022 रोजी तिस्ता सेटलवाड यांनाही अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सप्टेंबर 2022 मध्ये अंतरिम जामीन मंजूर केला होता. गुजरात पोलिसांनी 25 जून 2022 रोजी अहमदाबाद डिटेक्शन ऑफ क्राइम ब्रँचने दाखल केलेल्या पुराव्यानुसार सेटलवाड यांना अटक केली होती. त्यांच्यावर 2002 च्या गुजरात दंगलीच्या संदर्भात निष्पाप लोकांना गोवण्याचा कट रचल्याचा आरोप होता. त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. 2 जुलै रोजी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. अहमदाबाद क्राइम ब्रँचने गुजरात दंगलीप्रकरणी तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस संजीव भट्ट आणि डीजीपी आरबी श्रीकुमार यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संजीव भट्ट आधीच तुरुंगात आहेत, तर तिस्ता आणि श्रीकुमार यांना आता अटक करण्यात आली आहे.2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणार्‍या एसआयटीच्या अहवालाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी, 24 जून रोजी फेटाळून लावली. झाकिया जाफरी यांनी ही याचिका दाखल केली होती. दंगलींमध्ये झाकिया जाफरी यांचे पती एहसान जाफरी मारले गेले होते. झाकिया यांच्या याचिकेत मेरीट नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

COMMENTS