Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टिटवी येथे बंजारा परंपरेतील तीज सण उत्साहात 

सिंधू संस्कृतीची जाेपसली परंपरा;मातृ शक्तीचा केला गौरव

लोणार:- भारतीय संस्कृतीत प्रत्येक जाती धर्मातील विविध उत्सव वेगळ्या ढंगाने व परंपरेने साजरे केले जातात. त्यामुळेच आपल्या देशातील विविधतेत एकता दि

रामेश्‍वरच्या त्रिवेणी संगमावर तिघा भावांचा बुडून मृत्यू
महाविकास आघाडी अडचणीत
पुण्यातील बेकायदेशीर पबवर हातोडा

लोणार:- भारतीय संस्कृतीत प्रत्येक जाती धर्मातील विविध उत्सव वेगळ्या ढंगाने व परंपरेने साजरे केले जातात. त्यामुळेच आपल्या देशातील विविधतेत एकता दिसून येते. इसवी सन पूर्वपासून बंजारा समाजात चालत आलेला सर्वात महत्वाचा तीज उत्सव टिटवी परिसरात नायक कारभारी डावो सलो लावा लष्कर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.

कधीकाळी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. श्रावण महिन्यात ठिकठिकाणी बंजारा तांड्यांवर तिज उत्सवाची पाहायला मिळतो. सध्या तीज उत्सवाच्या बंजारा लोक गीतांनी तिथल्या लोकांवर चांगलच गारुड घातलं आहे. पारंपारिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या महिला मुली सहभागी झाल्या. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा,लोकसंस्कृती आणि वेगळेपण जपल्याचे या निमित्ताने दिसून आले.

महिला प्रधान संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उत्सव मातृ शक्तीला वंदन करणारा असून, आद्यगण “गण गौर” यांचे महत्व विशद करणारा आहे. दर सालाबाद प्रमाणे यंदाही उत्सव टिटवी परिसरातील तांड्याचे नायक कारभारी यांच्याकडे आयोजित करण्यात आला.यावेळी मोठया प्रमाणात बंजारा बांधव आणि भगिनी या उत्सवाला उपस्थित हाेत्या. यावेळी नायक कारभारी डावो सालो लावा लष्कर पाहुणे,नाईक सखाराम राठोड,कारभारी श्रीराम पवार,ज्ञानेश्वर राठोड, दिलीप राठोड मेंबर, डॉ.अमोल राठोड, गोर पवन राठोड, डफली वादक ज्ञानदेव राठोड, राम चव्हाण,राजू जाधव, बळीराम राठोड बंजारा समाज बांधव उपस्थित होते. 

‘गौरी’स्वरूप धान घेऊन तांड्याला घालतात प्रदक्षिणा – तिज हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच. तिज म्हणजे बंजारा समाजाच्या लोक संस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव. या उत्सवात दहा दिवसाआधी अविवाहित मुली एका टोपलीत ‘गौरी स्वरूप’ धान (गहू) पेरतात, रोज त्याला पाणी घालून बोलीभाषेत आराध्य देवतांची गीते म्हटली जातात. विसर्जनाच्या दिवशी डोक्यावर ‘गौरी’स्वरूप धान घेऊन वाजत गाजत तांड्याला प्रदक्षिणा केली जाते. गावालग तलावात तीज विसर्जन केले जाते.लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली, महिला तिज उत्सवाच्या निमित्याने माहेरी येतात. त्यामुळे या उत्सवाला वेगळे महत्त्व आहे.

COMMENTS