नवी दिल्ली प्रतिनिधी - आगामी काही दिवसांत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा

नवी दिल्ली प्रतिनिधी – आगामी काही दिवसांत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय संघातील १५ सदस्यांची घोषणा केली. आता यात कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही, असं अजित आगरकरनं स्पष्ट केलं.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यांचा संघ घोषित करण्यात आला. त्यात रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. मात्र, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा, आर. अश्विन, शिखर धवन आणि तिलक वर्मा यांना संधी देण्यात आली नाही.
COMMENTS