महिला शिक्षण दिनी शिक्षिकांचा झाला गौरव…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला शिक्षण दिनी शिक्षिकांचा झाला गौरव…

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी (दि.3 जानेवारी) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त महिला

अकोले शहरातील गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे : मच्छिंद्र मंडलिक
डॉ. सुनील शिंदे यांच्या ‘अगस्त्यकांता लोपामुद्रा’ या गौरवस्तोत्राचे प्रकाशन
मविआने अकोले विधानसभा मतदारसंघ माकपला सोडावा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी (दि.3 जानेवारी) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयुर्वेद महाविद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात शहरात शिक्षण क्षेत्रात विद्यादानाचे पवित्र कार्य करणार्‍या महिला शिक्षिका व प्राध्यापिकांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा जोपासण्याचे काम महिला शिक्षिका करीत आहेत असे गौरवोदगार आ.संग्राम जगताप यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रा. माणिक विधाते यांनी प्रास्ताविक करुन स्वागत केले. पुरस्कारार्थी महिला शिक्षिका व प्राध्यापिकांनी पिढी घडवण्याची मोलाची कामगिरी बजावली आहे. ज्या देशात शिक्षकांचा सन्मान होतो, ते देश आघाडीवर आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणामुळे महिलांना मानसन्मान मिळाला असून, अनेक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पुरस्काररुपाने पाठीवर थाप मिळाल्याने काम करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याची भावना शिक्षिकांनी मनोगतात व्यक्त केली. आमदार अरुण जगताप यांनी पुरस्कारार्थी महिला शिक्षिका व प्राध्यापिकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, साधना बोरुडे, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, अर्बन सेलचे प्रा. अरविंद शिंदे, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, ओबीसी सेलचे अमित खामकर, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, अमोल कांडेकर, गणेश बोरुडे, लहू कराळे, दादा दरेकर, दीपक खेडकर, निलेश इंगळे, संतोष ढाकणे, मनीष फुलडहाळे, मयुर भापकर, किरण जावळे, संतोष हजारे आदी उपस्थित होते.
समाज घडविण्यासह संस्कार रुजविण्याचे कार्य महिला शिक्षिका करीत आहेत. कुटुंब व शाळेतून मुलांमध्ये संस्कार घडत असतात. सुजाण भावी पिढी घडवून राष्ट्राचा पाया भक्कम करण्याचे काम शिक्षक करत आहेत, असे सांगून आ. संग्राम जगताप म्हणाले, कोरोना काळात शिक्षकांनी उत्तम योगदान देऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले. गरजू घटकातील मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून दीडशे एलईडी शाळांच्या डिजिटल वर्गासाठी देण्यात आले. तसेच गरजू घटकातील मुलांना स्मार्टफोनचे वाटपही करण्यात आले. कष्टकरी वर्गाची मुले सुशिक्षित झाल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शिक्षिकांचा झाला सन्मान
या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्यावतीने डॉ. प्रतिमा शेळके-जोगदंड, प्रभावती पादीर (न्यु आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालय, डॉ. स्मिता भुसे (पेमराज सारडा महाविद्यालय), अनिता कराळे, ज्योत्सना देशमुख (राधाबाई काळे महिला महाविद्यालय), सुजाता लोंढे, सुलक्षणा गायकवाड (अहमदनगर महाविद्यालय), प्रियंका खुळे-कांडेकर (न्यु लॉ कॉलेज), गायत्री रायपेल्ली (रुपीबाई बोरा स्कूल), वैशाली वाघ (अशोकभाऊ फिरोदिया), सुषमा चिटमिल (भाऊसाहेब फिरोदिया), वैशाली मेहेत्रे-बोरुडे, अर्पणा लाड-शेकडे (ग.ज. चितांबर), राधिका जेऊरकर (शेठ नंदलाल धुत), गितांजली भावे (भिंगार हायस्कूल), सुरेखा कजबे-नजान (सरस्वती विद्या मंदिर), कांचन गावडे (पेमराज गुगळे), रुपाली शिंदे (भाग्योदय विद्यालय, केडगाव) कल्पना विधाते (विखे पाटील कॉलेज), शारदा पोखरकर (आनंद विद्यालय), संगिता ठुबे, वैशाली जाधव-दारकुंडे (रेसिडेन्शिअल विद्यालय) या महिला शिक्षिका व प्राध्यापिकांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

COMMENTS