Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांमधील कलारूपी राजहंस शिक्षकांनी शोधावा : प्रा. चव्हाण

शेवगाव : वडुले खुर्द (ता.शेवगाव) येथील श्री संत वामनभाऊ विद्यालयाच्या जिजाऊ गार्डनमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन वडुले खुर्दच्या सरपंच मिराबाई भाऊसाहेब आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा. किसन चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव वाघोलीचे युवा नेते उमेश भालसिंग, सरपंच भाऊसाहेब उघडे, ज्ञानेश्वरचे माजी संचालक साहेबराव आंधळे, भाऊसाहेब आव्हाड, माजी सरपंच बाळासाहेब आव्हाड, उपसरपंच विष्णू आव्हाड, माजी सरपंच चंद्रकांत रणमले, पांडूकाका नागरे, विष्णुपंत आव्हाड, चेअरमन पांडुरंग दातीर, नवनाथ आव्हाड, धर्मनाथ आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, “प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक कलारूपी राजहंस दडलेला असतो. तो शोधून काढण्याचे कठीण पण पवित्र कार्य शिक्षक करीत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे व त्यांच्या मेहनतीचे फळ समाजासमोर मांडण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन हे एक प्रभावी व्यासपीठ आहे.” यावेळी प्रमुख पाहुणे उमेश भालसिंग व बाळासाहेब सुसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  या स्नेहसंमेलनात सुमारे ७० बालकलाकारांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीता चव्हाण, फिरोज पठाण, गणेश भालसिंग, शैलजा सोनवणे, गणेश वाणी, संजय डमाळ, महादेव मगरे, भाऊसाहेब मोरे, एकनाथ पवार, अमर घुले, स्वप्नील काशीद,  वांढेकर, बापूराव भुसारी, श्रीधर डोळस, ज्ञानेश्वर भिटे आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब गाडेकर, ग्रामपंचायत सदस्य तात्याबा तुतारे, शिवनाथ आव्हाड, महादेव सुतारे, कैलास आव्हाड (मेजर), एकनाथ आव्हाड, अमोल आव्हाड, संभाजी आंधळे, माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाळासाहेब सुसे यांनी केले, तर आभार भाऊसाहेब मोरे यांनी मानले.

विद्यार्थ्यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवावे : पो.नि.मुटकुळे
पुनर्वसित गावांसाठी पाच कोटींचा निधी  
उमेद कात्रण चिकटवही स्पर्धेचा निकाल जाहीर

शेवगाव : वडुले खुर्द (ता.शेवगाव) येथील श्री संत वामनभाऊ विद्यालयाच्या जिजाऊ गार्डनमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन वडुले खुर्दच्या सरपंच मिराबाई भाऊसाहेब आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा. किसन चव्हाण होते.

प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव वाघोलीचे युवा नेते उमेश भालसिंग, सरपंच भाऊसाहेब उघडे, ज्ञानेश्वरचे माजी संचालक साहेबराव आंधळे, भाऊसाहेब आव्हाड, माजी सरपंच बाळासाहेब आव्हाड, उपसरपंच विष्णू आव्हाड, माजी सरपंच चंद्रकांत रणमले, पांडूकाका नागरे, विष्णुपंत आव्हाड, चेअरमन पांडुरंग दातीर, नवनाथ आव्हाड, धर्मनाथ आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, “प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक कलारूपी राजहंस दडलेला असतो. तो शोधून काढण्याचे कठीण पण पवित्र कार्य शिक्षक करीत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे व त्यांच्या मेहनतीचे फळ समाजासमोर मांडण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन हे एक प्रभावी व्यासपीठ आहे.”

यावेळी प्रमुख पाहुणे उमेश भालसिंग व बाळासाहेब सुसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  या स्नेहसंमेलनात सुमारे ७० बालकलाकारांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीता चव्हाण, फिरोज पठाण, गणेश भालसिंग, शैलजा सोनवणे, गणेश वाणी, संजय डमाळ, महादेव मगरे, भाऊसाहेब मोरे, एकनाथ पवार, अमर घुले, स्वप्नील काशीद,  वांढेकर, बापूराव भुसारी, श्रीधर डोळस, ज्ञानेश्वर भिटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब गाडेकर, ग्रामपंचायत सदस्य तात्याबा तुतारे, शिवनाथ आव्हाड, महादेव सुतारे, कैलास आव्हाड (मेजर), एकनाथ आव्हाड, अमोल आव्हाड, संभाजी आंधळे, माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाळासाहेब सुसे यांनी केले, तर आभार भाऊसाहेब मोरे यांनी मानले.

COMMENTS