सहा महिन्यात ’फ्लेक्स फ्यूएल इंजिन’अनिवार्य : नितीन गडकरी

Homeताज्या बातम्यादेश

सहा महिन्यात ’फ्लेक्स फ्यूएल इंजिन’अनिवार्य : नितीन गडकरी

नवी दिल्ली : आगामी काही काळातच सर्व प्रकारच्या वाहनांच्या इंजिनामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. येत्या सहा महिन्यात प्रत्येक वाहनाला ’फ्लेक्

मुंबईसह दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट धडकली
ट्रकच्या धडकेत प्रेमी युगूलाचा जागीच मृत्यू
ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासह सर्व सुविधा देऊ

नवी दिल्ली : आगामी काही काळातच सर्व प्रकारच्या वाहनांच्या इंजिनामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. येत्या सहा महिन्यात प्रत्येक वाहनाला ’फ्लेक्स फ्यूएल इंजिन’ अनिवार्य करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या ’ग्रीन एनर्जी अवॉर्ड’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी गडकरी म्हणाले की, इथेनॉल हे सर्वाधिक परवडणारे इंधन असून इथेनॉल हे विमानातील इंधनासाठीही यशस्वी झाले आहे. एकापेक्षा अधिक इंधनावर चालणारे फ्लेक्स इंजिन आहे. वाहन निर्मिती करणार्या कंपन्यांना फ्लेक्स इंजिन बनविणे अनिवार्य करण्यात येणार आहे. येत्या 6 ते 8 महिन्यात असे आदेश शासन जारी करणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता पर्यायी इंधनाची गरज असून इथेनॉल, सीएनजी, बायो एलएनजी, इलेक्ट्रिक हे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे. या इंधनावर सर्वांना जावेच लागणार आहे. सरकारही या दिशेने काम करीत आहे. पेट्रोल डिझेलची 80 टक्के आयात संपवून ती शून्य टक्क्यावर न्यायची आहे. कारण पर्यावरणाच्या दृष्टीने डिझेल अधिक घातक असल्याचे सिध्द झाले आहे. कच्च्या क्रूड तेलाची आयात थांबवायची असेल तर हरित ऊर्जेला अधिक प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. यावेळी ना. गडकरी यांनी फेडरेशनच्या पदाधिकार्यांना विविध स्रोतांच्या माध्यमातून हरित ऊर्जेच्या क्षेत्रात अधिक संशोधन आणि काम करण्याच्या सूचना केल्या. या कार्यक्रमात हरित ऊर्जा क्षेत्रातील अनेक कंपन्यांना पारितोषिक देण्यात आले. महाराष्ट्राच्या महाजेनको या कंपनीलाही पुरस्कार देण्यात आला. याच कार्यक्रमात अण्णासाहेब पाटील लिखित मराठी पुस्तकाचे हिंदीत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

COMMENTS