Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रायगडमध्ये तटकरे-गोगावले वाद टोकाला

रायगड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील तटकरे आणि गोगावले यांचा वाद टोकाला पोहचला आहे. महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्य

इंदापूर तालुक्यात निवडणुकीनंतर गोळीबार
 करिअरसाठी उत्तम व प्रतिभावंत क्षेत्र निवडा : नवनाथ धुमाळ
तब्बल 28 वर्षानी माजी विद्यार्थ्यांचा स्रेह मेळावा

रायगड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील तटकरे आणि गोगावले यांचा वाद टोकाला पोहचला आहे. महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या तुफान हाणामारीनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले म्हणाले की, विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड हे सुनील तटकरे यांनीच पाठवले होते. जे आम्हाला गुंड म्हणतात, तेच स्वतः गुंड पाठवून षडयंत्र रचत आहेत. आम्ही कोणती दंडेलशाही करत नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर हत्यारे घेऊन हल्ला करण्यासाठी गुंड पाठवले गेले. जशास तसे उत्तर आमच्या कार्यकर्त्यांनी दिलं आहे. पोलिस चौकशीनंतर या घटनेचा तपास केला जाईल. आमच्यावर हत्यारे घेऊन येणार्‍या या हल्लेखोरांची चौकशी सर्वांसमोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS