जामखेड/प्रतिनिधी ः शासनाच्या वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत मतदारसंघातील 25 कामांसाठी 109 लक्ष रूपयांचा निधी आ. प्रा. राम शिंदे यांच्

जामखेड/प्रतिनिधी ः शासनाच्या वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत मतदारसंघातील 25 कामांसाठी 109 लक्ष रूपयांचा निधी आ. प्रा. राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला आहे. याबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून 31 मार्च 2023 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे तांडावस्त्या प्रकाशमान होणार आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील 22 तांडा वस्त्यांवर विजेची समस्या गंभीर होती.
महाराष्ट्रातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या तांड्यांच्या सुधारणेसाठी जिल्हा स्तरीय समितीने कर्जत-जामखेड मतदारसंघातील 25 कामांची सरकारकडे शिफारस केली होती. त्यानुसार आ. प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या वस्त्यांवरील अंधार दुर करण्याबरोबर या वस्त्यांवरील नागरिकांच्या आयुष्यातील अंधार दुर करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार पाठपुरावा केला होता. त्यामुळे वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेत समावेश होऊन तब्बल 109 लक्ष रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. सदर तांडावस्त्यांवर वीज पुरवठा करण्यासाठी भरीव निधी मंजुर झाला आहे. त्यामध्ये जामखेड तालुक्यातील कवडगाव-सांगळे गितेवस्ती, पिंपरखेड-कारंडेवस्ती, धानोरा-धानोरा गावठाण, धानोरा-फुंदे मिसाळ जायभाय वस्ती, अरणगाव-धनगरवस्ती, अरणगाव-वंजारवस्ती, खर्डा-गिते वाडी, खर्डा-पांढरेवाडी, खर्डा-वडारवाडा, खर्डा-रजपूत भामटा, खर्डा-दरडवाडी, मुंजेवाडी-जाधववस्ती, वाकी-कोळेकर वस्ती, धामणगाव- सोनारवाडा वस्ती या ठिकाणांचा समावेश आहे.
COMMENTS