Homeताज्या बातम्यामनोरंजन

तानाजी मालुसरे अन सुन्न करणार शिवगर्जना… शिवअष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ चित्रपट प्रदर्शित

मुंबई प्रतिनिधी - सुभेदार हा सिनेमा २५ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. शिवराज अष्टकमधील पाचवं पुष्प प

KRK यांच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल
संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ.
ग्रामीण भागामध्ये महिलांच्या बँकांसमोर रांगाच रांगा

मुंबई प्रतिनिधी – सुभेदार हा सिनेमा २५ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. शिवराज अष्टकमधील पाचवं पुष्प पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भली मोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा आहे. मराठी सिनेमातील भव्यता हे या सिनेमाचं मुख्य आकर्षण आहे.  सुभेदार सिनेमा उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमावर आधारीत हा सिनेमा पाहण्याची उत्कंठा शिगेला आहे.महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुभेदार’ या मराठी  चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे.  लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी याआधीच्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांच्या जबरदस्त यशातून त्यांची  या विषयावरची आपली कमालीची पकड सिद्ध केली आहे.  कसा आहे हा सिनेमासिनेमातील कलाकारांनी जीव ओतून काम केलं आहे. सिनेमातील गाणी काळजाला भिडतात. सिनेमात असे अनेक सीन आहेत ज्यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कोंढाणा जिंकण्यासाठी आखलेली मोहीम या सिनेमातून दाखवण्यात आली आहे. जिजाऊंची महाराजांना असलेली खंबीर साथ याचंही चित्रण समर्पकरित्या करण्यात आलं. कोंढाणा जिंकण्याची घटना ही सर्वांत मोठी असली तरी त्यामागे असलेलं त्यांचं युद्धकौशल्य, रणनिती, शत्रूला पाहिलं नसतानाही त्याच्या सामर्थ्याबद्दल आणि त्याच्या सैन्याबद्दल केलेला अभ्यास यांसारख्या अनेक बारिकसारिक गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.  ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’ असं म्हणत कोंढाण्याची मोहीम हाती घेत विडा उचलला होता. फक्त ५०० मावळे घेवून तानाजी मालुसरे या किल्ल्याच्या मोहीमेसाठी गेले होते. अजय पुरकर यांनी तानाजी मालुसरे यांचं पात्र खूपचं दमदार साकारलं आहे. नेहमीचप्रमाणेच मृणाल कुलकर्णीआणि चिन्मय मांडलेकर यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात चित्रपटातील लढाईची १० मिनिट पैसे वसूल आहेत. शिवाजी महाराज अनेक पैलू तसेच त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावणारे मावळे हे सगळं अनुभवण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहा.. 

COMMENTS