Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’, 3 ते 4 महिन्यांत प्रमाणपत्र मिळणार

नांदेड प्रतिनिधी - साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात विडा तांबुलचे अतिशय महत्त्व असून ते देवीच्या

कोल्हापुरात 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
जळगावमध्ये पत्रकाराला बेदम मारहाण
जि.प., लातूर पं. स. च्या मुल्यांकनाची तपासणी

नांदेड प्रतिनिधी – साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात विडा तांबुलचे अतिशय महत्त्व असून ते देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी एक मानला जातो. देशभरातून माहूर येथे येणारे भाविक तांबुलचा प्रसाद आवडीने ग्रहण करतात. या तांबुलला आता जीआय टॅग मिळाला असून ती माहूरची ओळख निर्माण करणार आहे.
माहूरगड श्री रेणुका मातेचा पानाचा विडा तांबुल हा मुख्यप्रसाद आहे. पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विड्याचा वापर करतात. देवीची मंदिरे आहेत तेथे विशेष करून विडा तांबुल नैवेद्य देवीला अर्पण करण्याची परंपरा आहे. आई रेणुका मातेने श्री विष्णुकवी महाराज यांच्या स्वप्नात येऊन तांबुलाचा प्रसाद करून देण्यास सांगितले होता, तेव्हापासून ही प्रथा चालु आहे, असे तांबुल बनविणारे अमोल गावंडे यांनी सांगितले. सकाळी सहा ते रात्री साडे आठपर्यंत तांबुलाचा प्रसाद तयार करणे सुरू असते. पांडूरंग राठोड, संतोष परळकर, विशाल चौधरी, अभिषेक परळकर, लवकुश जाधव व अनिल परळकर हे सात जण वंशपरंपरेने तांबुल प्रसाद तयार करण्याचे व वितरणाचे काम करतात. तांबुलाची दिवसाला 25 ते 30 हजारांची विक्री होते. या तांबुलामध्ये नागवेलीची पाने, कात, चुना, सोप, सुपारी, लवंग, विलायची, जयफळ, जायपत्री, ओवा, धनीयादाळ, आस्मान तारा, ज्येष्ठ मध, चमनबार यांचा समावेश असतो. दरम्यान, यासाठी मुंबई येथील ’जीआय टॅग’ विभागाशी संबंधी गणेश हंगमिरे यांच्या पुढाकारातून हे शक्य झाले असून त्यांनी स्वता: हून याची माहिती व तांबुलाचे सॅम्पल घेतले होते. मागील दोन ते तीन दिवसांपूर्वीच तांबुलाला जीआय टॅग मिळाला असून पुढील तीन ते चार महिन्यांत प्रमाणपत्र मिळेल, असे त्यांनी सांगितले. यामुळे आता माहूरची ओळख निर्माण होणार आहे, असे गावंडे यांनी सांगितले. वर्ल्ड इंन्टलॅक्चअल प्रॉपर्टि ऑर्गनाइजेशन नुसार जीआय टॅग एकप्रकारचे लेबल आहे. जो कोणत्याही उत्पादनाच्या भौगोलिक ओळखीच्या रूपात दिला जातो. हा टॅग एखाद्या खास मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टला किंवा कोणत्याही खास पिकाला, नैसर्गिक उत्पादनाला दिला जातो. याची नोंद सरकार दरबारी घेतली जाते.

COMMENTS