लम्पी आजार प्रतिबंधासाठी ठोस पावले उचला – डॉ. अजित नवले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लम्पी आजार प्रतिबंधासाठी ठोस पावले उचला – डॉ. अजित नवले

राज्य सरकारने लम्पी प्रभावित भागाला 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे.

अहमदनगर प्रतिनिधी  -  जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लम्पी स्किन आजाराने राज्यातील पशुधनाला विळखा घातला आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने राज्यात

अकोलेतील 15 शाळांना संगणक संच प्रदान
मुळा धरणात बुडताना एकाला वाचवले, दुसऱ्याचा मृत्यू
निळवंडेचा लोकार्पण कृती समितीचे आंदोलक स्थानबद्ध

अहमदनगर प्रतिनिधी  –  जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लम्पी स्किन आजाराने राज्यातील पशुधनाला विळखा घातला आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने राज्यातील पशुधन व दुग्ध व्यवसाय या आजारामुळे धोक्यात आला आहे.  राज्यातील १९ जिल्ह्यांमधील २१८ गावे या  आजाराने प्रभावित झाली आहेत. ३४  जनावरांचा मृत्यू झाला आहे. हा आजार मोठ्या प्रमाणात संसर्गक्षम असल्याने प्रभावी उपाय योजना न केल्यास राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. शिवाय दुग्ध व्यवसाय कोलमडून पडू शकतो. राज्य सरकारने लम्पी प्रभावित भागाला ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. जनावरांची नियंत्रित क्षेत्रात किंवा त्या क्षेत्राबाहेर ने-आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या उपायोजनांची काटेकोर अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. मात्र केवळ एवढे करून भागणार नाही याची जाणीवही राज्य सरकारने ठेवण्याची आवश्यकता आहे. असे मत शेतकरी नेते  डॉ. अजित नवले(Dr. Ajit Navale) यांनी दिले आहे. 

COMMENTS