पाथर्डी ः डॉ. सुजय विखे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून जिवे मारण्याची धमकी देणार्या व्यक्तीवर कारवाई करावी यासाठी पाथर्डी तालुका भाजप

पाथर्डी ः डॉ. सुजय विखे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून जिवे मारण्याची धमकी देणार्या व्यक्तीवर कारवाई करावी यासाठी पाथर्डी तालुका भाजपाच्या वतीने पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, शहराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, माजी जि प सदस्य राहुल राजळे, नारायण पालवे,ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, अजय रक्ताटे, कुंडलिक आव्हाड, बजरंग घोडके, विष्णुपंत अकोलकर, अमोल गर्जे, अँड प्रतिक खेडकर, महेश बोरुडे, धनंजय बडे, अजय भंडारी, बाळासाहेब गोल्हार, मुकुंद गर्जे, अक्षय शिरसाट, नितीन एडके, शुभम गाडे, सुनील ओव्हळ, बबन बुचकुल, सचिन वायकर,बबन सबलस, पांडुरंग लाड, मंगल कोकाटे, ज्योती शर्मा, दिगंबर भवार, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजप कार्यकर्ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू असताना विरोधी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या नेत्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देत आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन आम्हाला संरक्षण द्यावे.आमच्या नेत्यांना शिवीगाळ करून गोळ्या घालून जिवे मारून टाकू अशा पद्धतीने धमकी देत असून यांची आत्तापासूनच दादागिरीची भाषा सुरू झाली आहे.नेत्यांना दादागिरी करत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हे तर सोडणार नाही त्यामुळे पोलिसांनी आम्हाला सुरक्षा देऊन आमच्या संरक्षणाची हमी घ्यावी.झालेला सर्व प्रकार हा निंदनीय असून याबाबत वरिष्ठ पातळीवर पोलीस अधिकार्यांना याची तातडीने माहिती देऊन दखल घेण्याची मागणी या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी केली.वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना आपल्या भावना मांडण्यात येतील असे आश्वासन यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिले
COMMENTS