Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार वारीसे हत्येप्रकरणी आरोपींवर कारवाई करा

बेलापुरातील पत्रकारांची निवेदनाद्वारे मागणी

बेलापूर/प्रतिनिधी : पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून पत्रकार शशीकांत वारीसे यांच्या हत्येस जबाबदार असणार्‍या व्यक्तीवर कठोर कारव

आजपासून अहमदनगर निर्बंधमुक्त, कोरोना नियमांचे उल्लंघन मात्र भोवणार
परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे ‘सर्वोच्च’ निर्देश | DAINIK LOKMNTHAN
आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा

बेलापूर/प्रतिनिधी : पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून पत्रकार शशीकांत वारीसे यांच्या हत्येस जबाबदार असणार्‍या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी बेलापुर व परिसरातील पत्रकारांनी पोलीसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पत्रकारवरील हल्ल्याबाबत पोलिसांनी तसेच शासनाने दखल घेवुन आरोपींना अटक करुन कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रत्नागिरी येथील पत्रकार शशीकांत वारीसे यांनी वृत्तपत्रात बातमी छापली म्हणून त्यांना गाडीची धडक देवुन ठार मारण्यात आले अशा गुन्हेगाराला कठोर शासन व्हावे. पत्रकारांना संरक्षण देण्याबाबत येणार्‍या अधिवेशनामध्ये आवश्यक ते पावले उचलावीत असेही निवेदनात म्हटले आहे. बेलापूर येथे औटपोस्टचे हेड कॉ. अतुल लोटके पोलिस हेड कॉ. रामेश्‍वर ढोकणे भारत तमनर नंदु लोखंडे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर भास्कर खंडागळे, अशोक गाडेकर, देवीदास देसाई, ज्ञानेश्‍वर गवले, नवनाथ कुताळ, शरद थोरात, भरत थोरात दिलीप दायमा, किशोर कदम, दिपक क्षत्रिय, सुहास शेलार आदीसह पत्रकारांच्या सह्या आहे.

COMMENTS