Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याविरोधी कारवाई करा

मुस्लिम समाजाच्या वतीने पाथर्डी पोलिस निरीक्षकांकडे मागणी

पाथर्डी ः हजरत महंमद पैगम्बर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी  यासाठी पाथर्डी पोलीस निरीक्षक संतोष मुटकु

ग्रहमान फिरले सांगून उपायाच्या बहाण्याचे मुलीचा विनयभंग
जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने 3 जून रोजी रक्तदान शिबीर
प्रवरासंगम येथील विद्या कोरडे दहावीत प्रथम

पाथर्डी ः हजरत महंमद पैगम्बर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी  यासाठी पाथर्डी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मुस्लिम बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी नासीर शेख, फारुख शेख, शन्नो पठाण, जुनेद पठाण, चांद मणियार, समीर शेख, मुन्ना शेख, मौलाना आमीन, मौलाना, समीर, मौलाना सलमान, फारूक बाबा शेख, उबेद आतार, असलम मणियार, शकील बागवान, बीलाल शेख, रफिक खलीफा, खाजा पिंजारी, शौकत शेख, महंमद शेख, नदीम शेख, वसीम मणियार, नवाब पठाण, कासम पठाण, यासीर आतार, फिरोज आतार, फिरोज मणियार, युनुस आतार आदी जण उपस्थित होते. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रामगिरी महाराजांच्या गादी सोबत मुस्लिम समाजाचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत मात्र त्यांचे वक्तव्य हे निषेधार्ह आहे.अशा वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.हे वक्तव्य करणार्‍या विरोधात व त्यांच्या सहकार्‍या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.

COMMENTS