पाण्याच्या वादातून कोयत्याने वार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाण्याच्या वादातून कोयत्याने वार

अहमदनगर/प्रतिनिधी : पिण्याचे पाणी भरावयाचे आहे, मोटार बंद का केली? आम्हाला पाणी भरु द्या असे म्हटल्याचा राग येऊन वसीम फारुख शेख, युसुफ फारुख शेख, कुद

अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय गौरवसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजी महाराज याच्या जयंती निमित्त अनाम प्रेम संस्थेस छावा संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रम
स्वच्छता अभियान ही लोकचळवळ व्हावी : डॉ. सागर बोरुडे

अहमदनगर/प्रतिनिधी : पिण्याचे पाणी भरावयाचे आहे, मोटार बंद का केली? आम्हाला पाणी भरु द्या असे म्हटल्याचा राग येऊन वसीम फारुख शेख, युसुफ फारुख शेख, कुदुस शेख, रेशम वसीम शेख, यास्मीन युसुफ शेख, आशा फारुख शेख (सर्व रा. फरातखाँ मश्जिद चौपाटी कारंजा, अहमदनगर) व आक्रम शेख (रा. मुकुंदनगर, अ.नगर) यांनी लाकडी दांडक्याने दगड व फरशीने खलील यासीन सय्यद (वय 45 वर्ष) व त्याच्या पत्नीस मारहाण करुन वसीम फारुख शेख याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने पाठीवर, बरगडीच्या खाली व कमरेच्यावर मारुन खलील यांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना फरातखाँ मशिद, चौपाटी कारंजा अ.नगर) येथे बुधवारी (1 जून) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
खलील यासीन सय्यद (वय 45 वर्ष) यांचे शेजारी वसीम फारुख शेख हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. खलील यांच्या घरातून बाहेर जाण्या-येण्यासाठी वसीम शेख यांच्या घरासमोरुन रस्ता आहे तसेच या रस्त्यामध्येच रेशम वसीम शेख ही धुणेभांडे करीत असल्याने जाण्या-येण्यास अडचण निर्माण होऊन या ठिकाणी पाणी साचून वास येत असल्याने त्यांना वेळोवेळी रोडवर धुणीभांडी करीत जाऊ नका, असे सांगितल्याने त्यांच्यात किरकोळ वाद होऊन ते वाद आपापसात मिटले होते. तसेच खलील यांच्याकडे पाणी भरण्यासाठी मोटार नसल्याने ते वसीम फारुख शेख यांच्याकडील मोटारीने पाणी भरण्यासाठी 150 रुपये प्रति महिना भाडे ठरवलेले असल्याने ते भाडेही देत आहे.
बुधवारी दि.1 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हायर शो रूम शेजारी शासकीय नळास पाणी सुटले. त्या नळास वसीम फारुख शेख याने त्याची इलेक्ट्रीक मोटार लावली असल्याने त्याने त्याचे पाणी भरुन झाल्यानंतर वसीम शेखने मोटार बंद केली. त्यानंतर साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खलील यासीन सय्यद हे रेशम वसीम शेख हिला म्हणाले की, आम्हाला पिण्यासाठी पाणी भरायचे असून तुम्ही मोटर का बंद केली? असे म्हटले असता रेशम हीने आमची मोटार आहे, त्यामुळे बंद केली आहे, असे म्हटले असता खलील हा रेशमला म्हणाला की, आम्ही मोटारचे पैसे देत आहोत, त्यामुळे आम्हाला पाणी भरु द्या असे म्हटले असता रेशम, आशा, यास्मीन यांनी खलील यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रेशम हीने तिचा पती वसीम फारुख शेख यास फोन करुन त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्याचवेळी युसुफ फारुख शेख, आक्रम शेख, कुदुस शेख त्या ठिकाणी आले. त्यावेळीसुध्दा खलीलने आम्हाला पिण्यासाठी पाणी भरु द्या असे म्हटले असता या सर्वांनी खालीलला व त्याच्या पत्नीस शिवीगाळ केली. रेशम, आशा व यास्मीन यांनी याला मारुन टाका असे म्हटले असता वसीम फारुख शेख हा घरात जाऊन कोयता घेऊन आला तसेच युसुफ फारुख शेख, आक्रम शेख, कुदुस शेख यांनी घरात जाऊन लाकडी दांडके घेऊन आले व त्यांनी खलीलला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच रेशम, आशा व यासमीन यांनी तेथे पडलेल्या दगडाने व फरशीने मारहाण करीत असताना वसीम फारुख शेख याने पाठीमागून येऊन खलीलच्या पाठीवर व बरगडीच्या खाली तसेच कमरेच्या वर कोयता मारुन गंभीर जखमी केले तसेच इतरांनी लाकडी दांडक्याने खलीलच्या डोक्यावर मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत खलीलच्या पत्नीच्या हातावर, पायावर, पाठीवर मुका मार लागला आहे. शेजारील नागरिकांनी खलिल यास उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS