Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती अमोलिक

बेलापूर प्रतिनिधी ः राजकीयदृष्ट्या बहुचर्चित बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महसूल मंत्री नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या नेतृत्वाखालील व जिल्

रांजणगावमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन
महापालिकेत पसरला आनंदोत्सव…132 जणांना पदोन्नती
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे तहसीलसमोर उपोषण

बेलापूर प्रतिनिधी ः राजकीयदृष्ट्या बहुचर्चित बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महसूल मंत्री नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या नेतृत्वाखालील व जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखालील गावकरी मंडळाच्या स्वाती उत्तमराव अमोलिक यांची निवड झाली.निवड चुरशीची होईल अशी चर्चा असताना 11-6 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवून सुधीर नवले, रविंद्र खटोड, अरुण पाटील नाईक, भरत साळुंके यांच्या नेतृत्वा खालील जनता विकास आघाडीला गावकरी मंडळाने धक्का दिला.                                              
बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीसाठी मंडल अधिकारी  भिमराज मंडलिक यांचे अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली. बैठकीस उपसरपंच अभिषेक खंडागळे, सदस्य मुश्ताक शेख, चंद्रकांत नवले, वैभव कुर्‍हे, मीना साळवी, तबसुम बागवान, प्रियंका कुर्‍हे, उज्वला कुताळ, सुशीलाबाई पवार, महेन्द्र साळवी, रविन्द्र खटोड, भरत साळुंके, शिला पोळ, रंजना बोरुडे, छाया निंबाळकर उपस्थित होते. सरपंच पदासाठी गावकरी मंडाळाकडून स्वाती अमोलिक तर जनता आघाडीकडून रमेश अमोलिक यांनी उमेदवारी केली.गावकरी मंडळाकडे दहा तर विरोधकांकडे सहा असे संख्याबळ होते तर माजी सरपंच महेंद्र साळवी यांची भूमिका गुलदस्त्यात होती. असे असताना स्वाती अमोलिक यांना अकरा तर रमेश अमोलिक यांना सहा मते मिळाली. विरोधकांचे एक मत फुटल्याची चर्चा निवडीनंतर रंगली होती. निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सत्कार समारंभ व आभाराची सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना जि.प.सदस्य शरद नवले यांनी विरोधकांचा समाचार घेतला ते म्हणाले की विरोधकांना चांगले काम देखवत नाही. सातत्याने विकासकामात अडथळे आणण्याचे एकमेव काम विरोधक करतात.नाम.राधाकृष्ण विखे पा. यांनी गावासाठी 126 कोटीची पाणी पुलावठा योजना तसेच 4 कोटी किमतीची आठ एकर जागा साठवण तलावाला मोफत दिली.पण विरोधकांत चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत नाही.  विरोधकांच्या घाणेरड्या राजकारणाचा परिणाम गेली वर्षभर गावाच्या विकास कामांवर झाला.पण आता विरोधकांना गावकरी मंडळाने चोख उत्तर दिले असून यापुढील काळात ठप्प झालेल्या विकासकामांना गती दिली जाईल. सरपंच व उपसरपंच व सदस्यांनी चोख कारभार व विकास कामे करावीत बाकी आडव्या जाणार्‍या मांजरांचा बंदोबस्त करण्याचे कामा मी करीन असे नवले म्हणाले.  यावेळी जालिंदर कुर्‍हे, हाजी इस्माईल शेख, विष्णुपंत डावरे, सुधाकर खंडागळे, बाळासाहेब दाणी, पुरुषोत्तम भराटे, एकनाथ नागले, भाऊसाहेब कुताळ, अँड. अरविंद साळवी, मोहसीन सय्यद, रावसाहेब अमोलिक, गोपी दाणी आदींची भाषणे झाली. यावेळी कार्यकर्ते, हितचिंतक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक आधिकारी मंडलिक यांना कामगार तलाठी प्रविण सूर्यवंशी, अक्षय जोशी, ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड यांनी सहकार्य केले.पोलिस यंञणेने चोख पोलिस बांदोबस्त राखून निवडणूक शांततेत पार पाडली.

COMMENTS