Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाराती घ्या नेत्र विभागातील पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा वाढल्या

आता पाच विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षण

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागातील पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्य

Buldhana : राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा संप चिघळला (Video)
परतीच्या पावसाची वाटचाल थंडावली… होणार ‘इतका’ विलंब
प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगचा घटस्फोट

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागातील पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी दोन जागांची राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वाढ केली असून आता पाच विद्यार्थ्यांना या विभागात पदव्युत्तर शिक्षण मिळणार आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या संबंधीची माहिती स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा नेत्र विभाग प्रमुख डॉ. भास्कर खैरे यांना दिली आहे. या संदर्भात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने एन एम सी/पीजीआय 2023-24/000224/ 032302 दि. 12 जून 2023 रोजीचे पत्र अधिष्ठाता कार्यालयाला प्राप्त झाले आहे. सदरील पत्रात एम एस ऑपथॉमलॉजी या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या महाविद्यालयास आता तीन जागा एवजी दोन जागा वाढवून पाच विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण देण्यास मान्यता दिली आहे.  स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागाचे काम राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयामध्ये अत्यंत दर्जेदार आणि सर्वोत्कृष्ट राहीले आहे. आता या विभागाला पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये आणखी दोन जागांची वाढ झाली असल्यामुळे अधिक रुग्ण सेवा करण्याची संधी मिळाली आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचा नेत्र विभाग या संधीचे निश्चित सोने करुन घेईल असा विश्वास अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी व्यक्त केला आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागास पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे पत्र अधिष्ठाता कार्यालयाला प्राप्त होताच वैद्यकीय महाविद्यालयाच्या नाककानघसा विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे, लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत दहीरे, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव व इतर विभाग प्रमुखांनी नेत्र विभाग प्रमुख तथा अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचे अभिनंदन केले.

COMMENTS