Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्य पक्षाचा दणका: रस्ते दुरुस्तीला सुरुवात

सिडको प्रतिनिधी -  स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या व संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या मार्गदर्शनाने आज नवीन नाशिक मधील अंबड विभागातील

पुण्यात झिका विषाणूचे 7 रुग्ण आढळले
Rajesh Tope : राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? | LOKNews24
सरन्यायाधीशांचे अनाठायी वक्तव्य ! 

सिडको प्रतिनिधी –  स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या व संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या मार्गदर्शनाने आज नवीन नाशिक मधील अंबड विभागातील कॉन्टेनेटल दातीर नगर दत्ता नगर मारुती संकुल घरकुल चे रस्ते खराब असल्यामुळे लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावे या बाबत निवेदन देण्यात आले होते.या निवेदनाची तात्काळ दखल घेत नाशिक महानगरपालिका विभागीय अधिकारी मयूर पाटील यांनी तात्काळ संबंधित विभागाला आदेश देऊन रस्ते दुरुस्त करण्यास सुरवात केली… हे निवेदन स्वराज्य पक्षाचे नितीन दातीर यांच्या नेतृत्वात व आशिष नाना हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन नाशिक विभागातील पदाधिकाऱ्यांनी दिले होते.

नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन ज्या पद्धतीने या भागातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली त्याबद्दल मनपा प्रशासनाचे स्वराज्य पक्षाच्या वतीने नितीन दातीर यांनी आभार मानले यापुढेही आपण स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या करण्यात येतील त्या तात्काळ पूर्ण कराव्यात स्वराज्य पक्ष हा जनसामान्यांचे प्रश्न सोडविणारा पक्ष आहे.त्यामुळे या विभागात ज्यावेळी रस्त्यांना सुरुवात झाली परिसरातील सर्व नागरिकांनी स्वराज्य पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी हे निवेदन देण्यासाठी नितीन दातीर आशिष हिरे शशी राजपूत प्रदीप शिंदे गजानन हरळ अंकुश सायखेडे समाधान शिंदे अमोल मुंगसे ज्ञानेश्वर कोटकर संदीप शिंदे लक्ष्मण हनवते सचिन हिवाळे आधी पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS