Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्य चांदवड तालुका पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर

नाशिक प्रतिनिधी - नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शेतकरी कामगार यांच्यासाठी आक्रमकपणे लढा उभा करून स्वराज्याच्या माध्यमातून न्याय देणे हेच आपलं उद्दिष

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत
अदानी स्पष्टीकरण का देता हेत ? 
बुलढाणा जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन पद्धतीला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

नाशिक प्रतिनिधी – नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शेतकरी कामगार यांच्यासाठी आक्रमकपणे लढा उभा करून स्वराज्याच्या माध्यमातून न्याय देणे हेच आपलं उद्दिष्ट पाहिजे- *करण गायकर*

स्वराज्य नाशिक जिल्हाप्रमुख प्रा.उमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त चांदवड तालुका कार्यकारणीचे स्वागत करून नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम ठाकरे यांनी केले तर त्यांनी तालुक्याच्या वतीने बोलतांना स्वराज्य संघटना ही तळागाळामध्ये आपले मुळे भक्कम करण्यासाठी अहोरात्र झटत असून स्वराज्य संघटनेच्या प्रति निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचे काम आम्ही नक्कीच यशस्वी करू अशाप्रकारे आश्वासन दिले .

चांदवड तालुका कार्यकारणी जाहीर करत असताना स्वराज्य संघटना युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या संकल्पनेतील स्वराज्य हे सुराज्य व्हावं या हेतूने सर्व पदाधिकाऱ्यांनी भविष्यामध्ये आपल्या पदाला न्याय द्यावा व सामान्य जनता, शेतकरी,महिला, विद्यार्थी यांच्या प्रश्नाच्या बाबत प्रस्थापित नेत्यांना न घाबरता  आपण गावापासून हे प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात करावी.  ग्रामपंचायत, बाजार समिती, तालुका संघ असतील आदींमधील विविध प्रश्नांबाबत आपण आवाज उठवला पाहिजे, सर्वसामान्यांना न्याय देता आला पाहिजे,वेळप्रसंगी तुमच्या सर्वांच्या पाठीशी स्वराज्य संघटना भक्कमपणे उभी राहील. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष करण गायकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत मार्गदर्शन करतांना म्हणाले की स्वराज्य संघटना ही इतर पक्षांप्रमाणे किंवा इतर संघटनांप्रमाणे आपले कामकाज न करता छञपती संभाजी महाराज यांच्या अभ्यासू व सर्व जनतेला न्याय कसा मिळेल या दृढ निश्चयाने अभिप्रेत होवून कामकाज करणार आहे. शेतकऱ्यांबाबत पुढील पन्नास वर्षांचा काळ अभ्यासपूर्ण मांडणी करून कृषी क्षेत्र,सहकार,शिक्षण,उद्योग समाजकारण,राजकारण या सर्वच गोष्टींवर विशिष्ट चौकट निर्माण करणार आहे.

त्यामुळे संघटनेचे प्रामाणिकपणे काम केल्यास नक्कीच या क्षेत्रांचा विकास होऊ शकतो या दृष्टीने सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापली काम करावीअशी अपेक्षा व्यक्त केली व नक्कीच तालुक्याच्या विकासामध्ये स्वराज्य संघटनेचा हातभार कसा लागेल यासाठी काम करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

*स्वराज्य संघटना, चांदवड तालुका नवनियुक्त कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर….*

संताजी जाधव-उप तालुका प्रमुख चांदवड,

ज्ञानेश्वर ठोंबरे-तालुका कार्याध्यक्ष चांदवड,

केशव गांगुर्डे-कानमंडाळे गणप्रमुख,

अतुल वाकचौरे-तळेगाव गन प्रमुख,

शंकर जोंधळे-दुगाव गण संघटक, 

सागर चव्हाण-ग्रामीण युवा उपजिल्हा प्रमुख,

सागर अशोक-चांदवड तालुका संघटक,

सागर भोईटे-चांदवड तालुका संघटक,

धनंजय पाटील-प्रचार प्रसिद्धीप्रमुख,

विकास जाधव-मंगळूर गणप्रमुख,

थोरात शेवरे-धोडंबा गट संघटक,

रामचंद्र शिंदे-वाहेगाव साळसाने गट प्रमुख,

नवनाथ गोविंद शिंदे-मंगळूर गण संघटक,

रवींद्र गोविंद नवले-विद्यार्थी आघाडी तालुका प्रमुख,

  विकास आहेर-वडाळी शहर प्रमुख,

ललित उशीर-वडाळी भुई गटप्रमुख.

यावेळी कार्यक्रमाला करण गायकर स्वराज्य संघटना राज्य संपर्कप्रमुख / प्रवक्ता ,नाशिक जिल्हाप्रमुख प्रा.उमेश शिंदे ,उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे, राज्य कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे, नवनाथ शिंदे ,शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख विजय खर्जुल, नवनाथ वैराळ जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामीण, शांताराम ठाकरे, संपतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन चांदवड तालुकाप्रमुख अंबादास जाधव ,युवक तालुकाप्रमुख विकास ठाकरे, तेजस नवले विद्यार्थी आघाडी तालुकाप्रमुख यांनी केले.  यावेळी स्वराज्य संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS