Homeताज्या बातम्यामनोरंजन

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीचा थाटात पार पडला साखरपुडा

टेलिव्हिजन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कबुली दिली. नुकताच या जोडीचा साखरपुडा झा

येवल्यात दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी | LOKNews24
बीसीसीआयकडून मोहम्मद शमी याची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
जल जीवन योजने अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेतील दुरुस्तीसाठीजांब गावातील गावकर्‍यांसह सरपंच व सदस्यांचे अमरण उपोषण सुरू

टेलिव्हिजन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कबुली दिली. नुकताच या जोडीचा साखरपुडा झाला असून त्यांच्यावर युजर्सने कौतुकाचा वर्षाव केला. दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिल्यापासून त्यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली होती. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत साखरपुड्याची माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी स्वानंदीने त्यांच्या साखरपुड्याची जय्यद तयारी सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान दोघांचेही रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आज स्वानंदीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याची माहिती दिली. यावेळी शेअर केलेल्या फोटोला स्वानंदीने कॅप्शन दिले की, “…आणि आम्ही बंधनात अडकलो”, स्वानंदी आणि आशिषचा हा साखरपुड्यातील फोटो बराच चर्चेत आला आहे. दोघांच्याही लूक विषयी बोलायचे तर, साखरपुडा समारंभात स्वानंदीने पेस्टल पिस्ता रंगाची साडी परिधान केली होती. तर स्वानंदीच्या साडीला मॅचिंग कलर असलेला कुर्ता आशिषने घातला होता. यावेळी स्वानंदी आणि आशिषच्या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला होता. समीर चौघुले, अमृता खानविलकर, नम्रता संभेराव, शरयू दाते, श्रेया बुगडे, यशोमन आपटेसह अनेक सेलिब्रिटी मंडळींनी कमेंट करत दोघांचेही कौतुक केलेय.अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने २० जुलैला रिलेशनमध्ये असल्याची घोषणा केली होती. तिने सोशल मीडियावर जाहीर करताच तिच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी मित्रांनी ही या स्वीट कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आमच्या दोघांचं ठरलंय’म्हणत स्वानंदीने त्यांचं लग्न ठरल्याची माहिती दिली होती.

COMMENTS