Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली नगरपालिकेकडून स्वच्छ पंधरवाडा अभियान

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी ः देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छता ही सेवा अंतर्गत साजरा करण्यात येणा

संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणजे आरोग्य सुविधायुक्त सेंटर – देवेंद्र फडणवीस
मुळाच्या टेल भागातील पाणी वापर संस्थांनी जागृत राहावे
कर्जतच्या वनक्षेत्रात हरणाची शिकार

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी ः देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छता ही सेवा अंतर्गत साजरा करण्यात येणार्‍या स्वच्छ पंधरवडा अंतर्गत शहरातील श्री छत्रपती शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय व राहुरी फँक्टरी  येथिल श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनि काँलेजचे स्काउट गाइडचे तर एन.सी.सी.च्या स्वच्छता अभियनात भाग घेवून शहरात स्वच्छता केली. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छता ही सेवा अंतर्गत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 स्वच्छ पंधरवडा अभियान राबविले जात आहे.
देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्काउट गाइडच्या विध्यार्थीनी खांदे गल्ली चौक, मराठी शाळा प्रवेशद्वार यापरीसरातील साफसफाई करण्यात आली. तसेच राहुरी फँक्टरी येथिल श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनि काँलेजचे एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता छत्रपती श्री. शिवाजी महाराज पुतळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरात साफसफाई करुन  स्वच्छता अभियनात सहभागी झाले.यावेळी प्राचार्य लुकस संसारे, प्राचार्य पोपट कडुस, एनसीसी प्रमुख संदीप गोसावी, स्काउट गाइडप्रमुख आर.बी. कुलधरण उपस्थित होते. तसेच मुख्याधिकारी तुषार आहेर, प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

COMMENTS