Homeताज्या बातम्यादेश

विमानतळ अधिकार्‍याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

डेहराडून ः उत्तराखंड विमानतळ प्राधिकरणात नोकरीस असलेल्या एका अधिकार्‍याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ माजली आहे. या अधिकार्‍याचा मृतदेह त्याच्या घर

पुण्यात सिंहगड रोडवर फळविक्रेत्याची हत्या
सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एक महिला दलाल गजाआड
नगर अर्बन बँकेचे विलिनीकरण होणार की अवसायनात निघणार?

डेहराडून ः उत्तराखंड विमानतळ प्राधिकरणात नोकरीस असलेल्या एका अधिकार्‍याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ माजली आहे. या अधिकार्‍याचा मृतदेह त्याच्या घरात महिलेचे कपडे घातल्याच्या स्थितीत आढळला. एवढेच नाही तर त्याच्या कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक व हातात बांगड्याही भरल्या होत्या. या अधिकार्‍याने आत्महत्या केल्याचा संशय आहे, पण त्यांनी अशाप्रकारे विचित्र स्थितीत आत्महत्या का केली? असा सवाल उपस्थित होत आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांचे 2 नातलग घरात होते.

COMMENTS