नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वसंत विहार येथील चिन्मय शाळेत सहावीत शिकणार्या 12 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून, या घटनेमुळे प

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वसंत विहार येथील चिन्मय शाळेत सहावीत शिकणार्या 12 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेप्रकरणी गुरूवारी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच दोन पद्धतीचा तपास करण्याचेही आदेश दिले आहेत.
COMMENTS