Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आशिष देशमुख यांचे 6 काँग्रेसमधून निलंबन

नागपूर/प्रतिनिधीः काँगे्रसविरोधी वक्तव्य करणार्‍या आशिष देशमुख यांचे काँगे्रसमधून 6 वर्षासाठी निलंबन करण्यात आले. पक्षातील नेत्यांविरोधात केलेल्य

महिला सक्षमीकरणासाठी जास्तीत जास्त उपक्रम राबविणार-राजाराम कासार
संदीप वराळ खून प्रकरण लवकर निकाली काढा
महाराष्ट्र प्रशासनाला झालेलं इन्फेक्शन शिंदे फडणवीस सरकारने दूर केलं – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर/प्रतिनिधीः काँगे्रसविरोधी वक्तव्य करणार्‍या आशिष देशमुख यांचे काँगे्रसमधून 6 वर्षासाठी निलंबन करण्यात आले. पक्षातील नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे आशिष देशमुख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नाना पटोले, राहुल गांधी आणि इतर नेत्यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता आशिष देशमुख काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशमुख हे भाजपमध्ये जाऊ शकतात अशी चर्चाही दबक्या आवाजात होऊ लागली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक जारी केले असून त्यात आशिष देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. देशमुख यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

COMMENTS