Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टपाल खात्यामार्फत सूर्यघर योजनेचे सर्वेक्षण सुरु

कर्जत ः टपाल खात्यामार्फत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी सर्वेक्षण करणे सुरू आहे. पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक घरोघरी जाऊ

अहमदनगर : पत्रकार कुटुंबीयांचा दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात
विजेच्या पोलवर दिव्यांऐवजी पेटल्या मशाली
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची निवड

कर्जत ः टपाल खात्यामार्फत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी सर्वेक्षण करणे सुरू आहे. पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करत आहेत व त्याद्वारे लाभार्थ्याची नोंदणी करत आहेत. देशभरात एक कोटी तर महाराष्ट्रात बारा लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट यामध्ये ठेवलेले आहे.
प्रवर अधीक्षक डाकघर बी. नंदा यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागातही हे सर्वेक्षण चालू आहे, अशी माहिती उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांनी दिली. या योजनेत घरावर सोलर वीज निर्मिती संच बसवून वीज निर्मिती करायची व विजेची गरज पूर्ण करायची अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा जास्त वीज निर्मिती झाल्यावर विजबील शून्य येईल म्हणजेच वीज मोफत मिळेल व त्यासोबत जास्तीची वीज महावितरण कंपनीला विकून उत्पन्नही मिळेल. 0 ते 150, 150 ते 300 व 300 पेक्षा जास्त युनिट वीज लागणार्‍या वैयक्तिक घरावर सोलर बसणार्‍या कुटुंबाला एक ते तीन किलो वॅट सोलर संच्यासाठी तीस हजार ते अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. सध्या वापरत असलेली वीज वितरण कंपनीची माहिती, वीजबीलाचा फोटो व घराच्या छतावर असलेली मोकळी जागा इत्यादी गोष्टीची नोंदणी पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक मार्फत केली जात आहे. यासाठी स्वतःचे पक्के घर, विजबील व स्वतंत्र किंवा टेरेसवर दहा बाय दहा ते वीस बाय वीस फुट मोकळी जागा असावी. कर्जत उपविभागातील पात्र ग्राहकांनी यामध्ये नोंदणी करावी असे आवाहन उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांनी केले आहे.

COMMENTS