अकोले : ZIKSUM Elevator Pvt. Ltd.कपंनीचे संस्थापक उद्योजक सुरज भवारी यांना महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवार्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अकोले

अकोले : ZIKSUM Elevator Pvt. Ltd.कपंनीचे संस्थापक उद्योजक सुरज भवारी यांना महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवार्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील रहिवासी व मुंबईत स्थायिक झालेले उद्योजक सुरज भवारी यांना महाराष्ट्र बिजनेस आयकॉन अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला
निवासी, व्यावसायिक आणि सोसायटी प्रकल्पांसाठी दर्जेदार लिफ्ट सोल्युशन्स, मजबूत After-Sales Service, सुरक्षा मानकांचे पालन आणि दीर्घकालीन ग्राहक संबंध यामुळे ZIKSUM Elevator Pvt. Ltd. ने बाजारात विश्वासार्ह ओळख निर्माण केली या कंपनीचे उल्लेखनीय प्रवास आदर्शवत आहे. या कंपनीचे संस्थापक सुरज भवारी हे अकोले सारख्या आदिवासी तालुक्यातील असून त्यांच्या उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कामामुळे हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार हा केवळ आर्थिक यशाचे प्रतीक नसून, नियोजनबद्ध वाढ, कार्यक्षम व्यवस्थापन आणि अखंड परिश्रम यांचा गौरव आहे. कठीण काळात त्यांनी दिलेला विश्वास, मानसिक आधार आणि व्यवस्थापन कौशल्यामुळेच हा प्रवास शक्य झाला असल्याचे सुरेश भवारी यांनी सांगितले.

COMMENTS