Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रिया सुळेंनी घेतली सुनेत्रा पवार यांची गळाभेट

पुणे प्रतिनिधी - महाविकास आघाडी की महायुती या प्रश्नावर पवार कुटुंबातील दोन दिग्गजांनी त्यांचा वेगळा मार्ग निवडला आहे. अजित पवार यांच्या बंडा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा जागेचे बुधवारी भूमिपूजन : प्रा. शामराव पाटील
तरुणांनी संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ः निवृत्ती महाराज देशमुख
खतरों के खिलाडी 13′ मध्ये कुत्र्याचा हल्लाने अभिनेत्री जखमी

पुणे प्रतिनिधी – महाविकास आघाडी की महायुती या प्रश्नावर पवार कुटुंबातील दोन दिग्गजांनी त्यांचा वेगळा मार्ग निवडला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर उभ्या महाराष्ट्राने पक्षातील ही फुट अनुभवली आहे. दोन्ही गोटातून दारुगोळा बाहेर पडत आहे. विखारी प्रचार तंत्र न वापरता मतदारांना भावनिक साद घातली जात आहे. लोकसभेच्या रणधुमाळीत पवार विरुद्ध पवार असा रंजक सामना होणार आहे. अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्यांमधील दुराव्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत चिरशीची होईल, यात शंका नाही. पण त्यापूर्वीच बारामतीतील एका घटनेने राजकीय विश्लेषकांना बुचकळ्यात टाकले आहे. एकमेकांविरोधात राजकीय लढाईची तयारी सुरु असतानाच नणंद-भावजयी यांची गळाभेट झाल्याने अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. तर बारामती मतदार संघात पवार विरुद्ध पवार सामना रंगणार हे निश्चित झाले आहे. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे सध्या या मतदारसंघाच्या खासदार आहेत. तर सध्या महायुतीत सहभागी झालेले अजितदादा यांची पत्नी सुनेत्रा पवार या मतदारसंघातून नशीब आजमावणार आहे. त्यामुळे सुळे विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. पण त्यापूर्वीच बारामतीत नाट्यमय घटना घडली. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची एका मंदिरात गळाभेट झाली.

COMMENTS