Homeताज्या बातम्यादेश

नीटप्रकरणी केंद्रासह ‘एनटीए’ला ‘सर्वोच्च’ नोटीस

पेपरफुटीप्रकरणी दोन आठवड्यात उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली ः नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी पेपरफुटीची स

चक्क पोलिस कर्मचाऱ्याने लुटले तब्बल 24 तोळे सोनं आणि 8 लाख 40 हजार रुपये
महिला आरक्षणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न ः राहुल गांधी
संजय राऊत कुठल्या लेवलचा गांजा ओढतात हे त्यांना विचारा – नितेश राणे (Video)

नवी दिल्ली ः नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी पेपरफुटीची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएला आणि केंद्र सरकरला नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलैला ठेवण्यात आली आहे. नीटच्या पेपरफुटीसंदर्भात हितेश सिंग कश्यप यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. कर्नाटक, ओडिशा, झारखंड आदी राज्यांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र निवडीसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये लाच दिल्याचा गंभीर आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. या प्रकरणात परीक्षा केंद्रावर ड्युटी करणार्‍या 5 शिक्षकांना अटक झाली आहे. त्यांनी चौकशीत 26 विद्यार्थ्यांबाबत माहिती दिली असल्याचेही याचिकेत नमूद आहे.
नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात देशभरात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणीही सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित केली जाऊ शकते. वास्तविक, विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि अलाहाबाद उच्च न्यायालयासह देशातील 7 राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये परीक्षेत ग्रेस गुण देणे, गुण जुळणे आणि इतर अनियमिततांबाबत याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे वर्ग केल्या जाऊ शकतात. एनटीएने सांगितले की, देशातील 7 उच्च न्यायालयांमध्ये नीटसंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विविध न्यायालये वेगवेगळे निर्णय देत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात यावीत. याचिकाकर्त्यांनी एनटीए परीक्षेत 1563 उमेदवारांना दिलेल्या वाढीव गुणांवर आक्षेप घेतला होता. एनटीएने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीची 10, 11 आणि 12 जून रोजी बैठक झाली. सवलतीचे गुण मिळालेल्या 1563 उमेदवारांचे स्कोअरकार्ड रद्द करून त्यांची फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी सूचना समितीने केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांचा निकाल रद्द करत त्यांनी पुन्हा 23 जून रोजी परीक्षा द्यावी लागणार आहे.

विविध उच्च न्यायालयात 7 याचिका – दरम्यान, नीट परीक्षेतील फेपरफुटी आणि ग्रेस गुणांच्या गोंधळाविरुध्द देशातील विविध उच्च न्यायालयात 7 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याच्या मागणीसाठी एनटीएनेही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने संबंधितांना नोटीस जारी केली आहे. त्यावर 8 जुलैरोजी सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले.

COMMENTS