Homeताज्या बातम्यादेश

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली प्रतिनिधी - महाराष्ट्रातल्या विधानपरिषदेवर 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत मोठी बातमी आहे. तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून राज

जान्हवी कपूरने ‘ओम शांती ओम’चा ‘तो’ आयकॉनिक सीन केला रिक्रिएट
आकांक्षा कुंभार स्टार डायमंड इंटरनॅशनल फॅशन शोमध्ये विजेती
मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली प्रतिनिधी – महाराष्ट्रातल्या विधानपरिषदेवर 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत मोठी बातमी आहे. तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न रखडलेला आहे. हे सर्व प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली आहे.याचिकाकर्ते रतन सोहली यांना याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. तसेच, यातले दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना न्यायालयानं दाद मागायची असल्यास नवी याचिका करायला सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारने पाठवलेल्या यादीवर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. गेल्यावर्षी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेली नवी यादीही न्यायालयाच्या स्थगितीत अडकली आहे. त्यामुळे, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या स्थगितीवरील निर्णय अडकून पडला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली आहे.

सप्टेंबर २०२२ पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना कोर्टात स्थगिती देण्यात आली होती. आता, आज ही स्थगिती उठवण्यात आली आहे. या आधी न्यायमूर्ती जोसेफ यांच्याकडे हे प्रकरण सुरू होते. पण ते निवृत्त झाल्यानंतर आता हे प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणीसाठी आले होते. त्यावर, सरन्यायाधींना सुनावणी करताना ही स्थगिती उठवली आहे. त्यामुळे, आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

COMMENTS