Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समन्यायी पाणी वाटप बाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

आमदार आशुतोष काळेंचा दूरदर्शीपणा फायदेशीर ठरणार

कोपरगाव तालुका :  सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार (दि.02) रोजी23 सप्टेंबर 2016 रोजीच्या आदेशाला आव्हाण देणार्‍या सर्व याचिका निकाली काढुन मा. उच्च न

अण्णा भाऊ साठे योजनेच्या 1.65 कोटींच्या कामास मान्यता
अष्टशताब्दी वर्षनिमित्त कोपरगाव तालुक्यातील रस्ता करावा
वेस-सोयगाव तलावाच्या 9.98 कोटींच्या कामास मान्यता

कोपरगाव तालुका :  सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार (दि.02) रोजी23 सप्टेंबर 2016 रोजीच्या आदेशाला आव्हाण देणार्‍या सर्व याचिका निकाली काढुन मा. उच्च न्यायालय येथे दाद मागण्याची मुभा दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार केल्यास यामागे आमदार आशुतोष काळे यांचा दुरदृष्टीपणा दिसून येत असून त्यामुळे नगर-नाशिक जिल्ह्यातील गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने हा निर्णय फायदेशिर ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
समन्यायी पाणी वाटप कायद्यान्वये मराठवाड्यातील जनतेने नगर नासिकच्या धरणातून पाणी सोडण्याच्या 2012 साली केलेल्या मागणीस सर्वप्रथम आ. आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सभासद यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून विरोध दर्शविला होता. सदर याचिका मुंबई उच्च न्यायालयात चालविल्या जाव्यात असा आदेश देखील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सभासदांनी मिळविला होता. त्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयात सर्व याचिकांची वेळोवेळी सुनावणी होवून सदर याचिकांचा मा. उच्च न्यायालयाने दिनांक 23 सप्टेंबर 2016  रोजी आदेश पारित करतांना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई यांनी 19 मार्च 2014 रोजी जायकवाडी धरणात पाणी सोडणे बाबत दिलेला निर्णय कायम ठेवला होता. तसेच जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रात पाणी वापर संस्था स्थापन करणे, पश्‍चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविणे, प्राधिकरणाच्या 2014 च्या निर्णयाचा दर तीन वर्षांनी फेर आढावा घेणे असे अनेक आदेश पारित केले होते. मा.उच्च न्यायालयाचा 23 सप्टेंबर 2016 रोजीच्या आदेशाला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याप्रमाणे इतर कारखान्यांनी देखील सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सदरच्या याचिका सुनावणीसाठी प्रलंबित असतांना दरम्यानच्या काळात प्राधिकरण व महाराष्ट्र शासन यांनी 2014 च्या निर्णयाचा फेर आढावा न घेता 2023 च्या दुष्काळी परिस्थितीत देखील 2014 च्या कालबाह्य झालेल्या प्राधिकरणाच्या निर्णयाच्या समन्यायी कायद्याने जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अशा कालबाह्य निर्णयाच्या आधारे जायकवाडी धरणात पाणी सोडल्यास नगर-नासिकचे लाभ क्षेत्रावर कायमच अन्याय होणार या जाणीवेतून  आ. आशुतोष काळे यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे सप्टेंबर 2023 मध्ये कारखान्याच्या सभासदांच्या वतीने अ‍ॅड. नितीन गवारे यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल करून कालबाह्य निर्णयाच्या आधारे पाणी सोडण्यात येवू नये. या कालबाह्य निर्णयाला स्थगिती द्यावी व महाराष्ट्र शासनाने फेर आढावा घेण्यासाठी नेमलेल्या नवीन कमिटीचा अहवाल येईपर्यंत पाणी सोडण्याची कार्यवाही करू नये अशी मागणी केली होती.  आ. आशुतोष काळे यांनी दूरदृष्टीपणा ठेवून यापूर्वीच नोव्हेंबर 2023 मध्ये अवमान याचिका अ‍ॅड. गणेश गाडे औरंगाबाद व अ‍ॅड. विद्यासागर शिंदे यांच्या मार्फत दाखल केल्यामुळे नगर-नासिकच्या लाभ क्षेत्रावर होणारा अन्याय रोखण्यास निश्‍चितपणे मदत मिळणार आहे. नवीन कमिटीला देखील मुदतीच्या आत अहवाल देवून शासनाला देखील त्यावर कार्यवाही करावी लागणार असून व नियमितपणे याचिकांची सुनावणी होणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याकामी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अ‍ॅड. नितीन गवारे, मुंबई व अ‍ॅड. आशुतोष दुबे, यांनी काम पहिले.

COMMENTS