भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठीचे निलंबन घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट करत कोर्टाने ते रद्द केले आहे. न्यायमूर्ती

२ ॲागस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बाबू’ 
शिर्डीत 271 मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना
 मनसेने अनधिकृत संबोधलेली पाम बीच मार्गावरील मजार अधिकृत असल्याचा समाजवादी पार्टीचा दावा

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठीचे निलंबन घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट करत कोर्टाने ते रद्द केले आहे. न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. अशाप्रकारचे निलंबन केवळ २०२१ मधील पावसाळी अधिवेशनापुरतेच मर्यादित असू शकते, असे कोर्टाने म्हटले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोनदा सुनावणी झाली होती. आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी भाजप आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
विधानसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केलं होतं. या कारवाईला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आमच्यावर सूड भावनेने कारवाई केल्याचं म्हटलं होतं. आमच्यावर अन्याय झाल्याचंही भाजप आमदारांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानंतर राज्य सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना आमदारांचं निलंबन करण्याचा अधिकार हा विधानसभेचा आहे. तो त्यांच्या कार्यकक्षेचा भाग असल्याचं म्हटलं होतं. दोन वेळा या प्रकरणावर कोर्टात सुनावणी झाली होती. त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज अखेर निर्णय आला आहे.

निलंबित आमदार कोणते?
1 अतुल भातखळकर
2 राम सातपुते
3 आशिष शेलार
4 संजय कुटे
5 योगेश सागर
6 किर्तीकुमार बागडिया
7 गिरीश महाजन
8 जयकुमार रावल
9 अभिमन्यू पवार
10 पराग अळवणी
11 नारायण कुचे
12 हरीश पिंपळे

COMMENTS