Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्जचा पुरवठा

पुणे : शहर आणि जिल्ह्यात ड्रग्जचा विळखा घट्ट होतांना दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यात गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. त्

दिल्ली मेट्रोत महिलांचा पुन्हा राडा
धक्कादायक… धारदार शस्त्राने केला मालकाचा खून | LOKNews24
मामा-भाचे टोळीला मोक्का ; दोन खुनी हल्ले; कॅश लुटणारी नऊ जणांची टोळी

पुणे : शहर आणि जिल्ह्यात ड्रग्जचा विळखा घट्ट होतांना दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यात गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. त्यातच  पोलिसांकडून ड्रग्जची विक्री करणार्‍यांवर आणि रेव्ह पार्टी करणार्‍यांवर कारवाई केली जात असली तरी आता ड्रग्जच्या विक्रीसाठी नवनवे मार्ग वापरले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. हा व्यक्ती कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करत होती.
गेल्या अनेक दिवसांपासून हा व्यक्ती कुरिअरच्या पार्सल्सचा वापर करुन ग्राहकांना ड्रग्ज पुरवत होता. पुणे शहर आणि शहराबाहेर हा व्यक्ती कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पाठवायचा, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. विश्‍वनाथ कोनापूरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात तब्बल 1 कोटी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी ड्रग्स विकत असताना एकूण तीन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपींकडे चौकशी सुरू असताना एक आरोपी अनेक ठिकाणी  कुरिअरने ड्रग्स पाठवत असल्याची माहिती समोर आली. त्याआधारे पोलिसांनी कारवाई करत विश्‍वनाथ कोनापूरे याला ताब्यात घेतले होते. त्याने आता नेमक्या कोणाला ड्रग्ज विकले होते, याची माहिती आता चौकशीतून समोर येईल. त्यामुळे पोलिस आता याप्रकरणात आणखी कोणाला ताब्यात घेणार, हे पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात सातत्याने ड्रग्ज सापडत आहेत. अलीकडेच कात्रज परिसरात 106 ग्रॅम मेफड्रोन सापडले होते. या मेफेड्रॉनची किंमत 21 लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. कात्रज परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्री करण्यासाठी दोन तरुण आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून ड्रग्जची विक्री करणार्‍या राजस्थानमधील दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. काही दिवसांपूर्वी पुण्यातील ड्रग्जची समस्या ऐरणीवर आली होती तेव्हा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना कार्यालयात जात धारेवर धरले होते. ड्रग्ज व्यावसायिकांकडून पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना हप्ते दिले जातात, असा आरोप दोन्ही नेत्यांनी केला होता. यामध्ये पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची चांगलीच नाचक्की झाली होती. यानंतर पुणे पोलिसांनी ड्रग्जविरोधी मोहीम सुरु केली होती.

COMMENTS