Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवला

आखाती तणावाचा परिणाम : घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्यपुणे : पश्‍चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने पुणे जिल

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही तर दिल्लीश्‍वरांची इच्छा
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभाग घ्यावा
बोगस खते, बियाणे विकणार्‍यांवर कठोर कारवाई

आखाती तणावाचा परिणाम : घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य
पुणे : पश्‍चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने पुणे जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची सूचना वितरकांना देण्यात आली आहे.
गॅस वितरण करणार्‍या प्रमुख कंपन्यांकडून शुक्रवारी सकाळपासून वितरकांना व्यावसायिक सिलेंडरच्या नव्या मागण्या स्वीकारू नयेत, असे निर्देश देण्यात आले. चाकण आणि शिरूर येथील भरणा केंद्रांमधून ही माहिती देण्यात आली आहे. पाच, एकोणीस, पस्तीस, सत्तेचाळीस आणि चारशे सत्तावीस किलो वजनाचे व्यावसायिक सिलेंडर सध्या उपलब्ध करून दिले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत व्यावसायिक गॅससाठी वाहनेही पाठवू नयेत, असे वितरकांना कळविण्यात आले आहे. या निर्णयाचा परिणाम हॉटेल, खानावळी तसेच काही औद्योगिक आस्थापनांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गॅसचा पुरवठा मर्यादित झाल्याने घरगुती गॅस वितरणात अडथळा येऊ नये, यासाठी व्यावसायिक सिलेंडरचे वाटप काही दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. गॅस वितरक जीवन अल्हाट यांनी सांगितले की, कंपन्यांकडून औद्योगिक वापरासाठीचे सिलेंडर सध्या भरण्यात येणार नसून केवळ घरगुती सिलेंडरच उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. चाकण येथील भरणा केंद्रावर गेलेले काही ट्रक गॅस न भरताच परत पाठवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला साठा संपल्यानंतर व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रासाठीच्या गॅस वितरणावर तात्पुरती मर्यादा आल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम पुढील काळात सर्वसामान्यांनाही जाणवू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS