वंचितां समवेत भोजन करून पोलिस अधीक्षकांचे काम सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितां समवेत भोजन करून पोलिस अधीक्षकांचे काम सुरू

ओला यांनी स्नेहालयातील मुलांना दिली भेट

अहमदनगर प्रतिनिधी- नगरचे नवे पोलिस अधीक्षक राकेश ओला(Rakesh Ola) यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला असला तरी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पाहणी व्

निळवंडेचा लोकार्पण कृती समितीचे आंदोलक स्थानबद्ध
दुहेरी हत्याकांड करून झाले फरार.. पोलिसांनी आवळल्या मुसक्या l पहा LokNews24
योगिता खेडकर व हर्षदा गरुड यांची वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर प्रतिनिधी– नगरचे नवे पोलिस अधीक्षक राकेश ओला(Rakesh Ola) यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला असला तरी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पाहणी व्यतिरिक्त कार्यालयीन कामकाज सुरू केले नव्हते. ते त्यांनी सोमवारपासून (24ऑक्टोबर) सुरू केले, पण त्याआधी स्नेहालयातील वंचित मुलांसमवेत भोजनाचा आनंद घेत व त्यांना दिवाळी निमित्त मिठाई देऊन त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवले. अहमदनगर जिल्ह्यातील कामाला स्नेहालय संस्थेच्या भेटीने सुरुवात होत असल्याचा आनंद वाटतो, असे प्रतिपादनही पोलिस अधीक्षक ओला यांनी स्नेहालयात केले. दोन दिवसांपूर्वी शनिवारी (22 ऑक्टोबर) रात्री ओलायांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली व त्यानंतर रविवारी ते श्रीरामपूरच्या दौर्‍यावर गेले. तेथून आल्यावर सायंकाळी त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध कार्यालयांची पाहणी करून तेथील कामाची माहिती घेतली. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी स्नेहालयात जाऊन मुलांसमवेत दिवाळी आनंदोत्सव साजरा केला. सेवातीर्था पासून नगर जिल्ह्यातील सेवारंभ भाग्याचा असल्याचे गौरवोदगारही त्यांनी व्यक्त केले. लोकाश्रया वर आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या व्यापक सहभागातून विविध 27 सेवा प्रकल्प चालविणारे स्नेहालय हे देशातील एक अनोखे सेवातीर्थ आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ओला यांनी स्नेहालय संस्थेत सोमवारी दिवाळीचे सदिच्छा भोजन दिले. त्यांनी स्नेहालयाच्या विविध प्रकल्पांना भेटी देऊन मुलांसोबत जेवण केले. फटाके आणि मिठाई मुलांना दिली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायकपोलिस निरीक्षक युवराज आठरे, केंद्रीय दूरसंचार विभागाचे संचालक सौरभ देशमुख, उद्योजक ऋत्विक वाबळे,स्नेहालयचे संचालक हनीफ शेख, चंद्रकांत शेंबडे, संजय गुगळे, राजीव गुजर यावेळी उपस्थित होते. ओला यांनी स्नेहलयचा माहितीपट पहिला. येथील इंग्रजी माध्यम शाळा,केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल, रोजगार प्रशिक्षण केंद्र, समृद्ध ग्रंथालय, वसतिगृहाच्या नवीन वास्तू, भोजनगृह, कला स्टुडिओ या प्रकल्पांना भेटी दिल्या व लाभार्थी मुला-मुलींशी संवाद साधला. 

वंचितांच्या हक्क रक्षणासाठी पोलिसांची भूमिका अग्रकर्मी (प्रोअ‍ॅक्टीव्ह) राहील , असे यावेळी त्यांनी सांगितले. पोलिस प्रशासनात येण्यापूर्वी राजस्थान मध्ये न्यायाधीश म्हणून सात वर्षे केलेल्या कामाचा पोलिस प्रशासनात प्रश्‍न समजून घेताना उपयोग होतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ओला यांच्या हस्ते स्नेहालय परिसरात आंब्याचे झाड लावण्यात आले.

COMMENTS