Homeताज्या बातम्यादेश

सुनीता विल्यम्स अंतराळातून सुखरूप परतल्या

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल 9 महिन्यापासून अंतराळात अडकून पडल्

माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे वृद्धापकाळाने 90 व्या वर्षी निधन
बौद्ध सेवा संघाचे कार्य दिशादर्शक : आ.डॉ. सुधीर तांबे
महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य ; काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल 9 महिन्यापासून अंतराळात अडकून पडल्या होत्या. त्यांना परत पृथ्वीवर सुखरूप आणण्यासाठी नासाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते, अखेर 9 महिन्यानंतर दोन्ही अंतराळवीर बुधवारी (दि. 19) भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 वाजता फ्लोरिडाच्या किनार्‍यावर सुरक्षितपणे उतरले. हे दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे स्पेसएक्स कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनहून निघाल्यानंतर काही तासांतच अंतराळवीरांच्या स्पेसएक्स कॅप्सूलने मेक्सिकोच्या आखातात पॅराशूटने उड्डाण केले. फ्लोरिडातील टालाहासीच्या किनार्‍याजवळ ही लँडिंग झाली. अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडिओ देखील जारी केला आहे.

COMMENTS