खंडाळा / प्रतिनिधी : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात सातार्याकडे जाणार्या घाटमाथ्यावर दत्त मंदिरजवळ कंटेनर बंद पडल्याने या बाजूची वाहतूक सक
खंडाळा / प्रतिनिधी : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात सातार्याकडे जाणार्या घाटमाथ्यावर दत्त मंदिरजवळ कंटेनर बंद पडल्याने या बाजूची वाहतूक सकाळपासून विस्कळित झाली. बोगद्यामध्ये दुपारी टेम्पो बंद पडल्याने पुण्याकडून जाणारी वाहतूकही खोळंबली. घटनास्थळावर खंडाळा पोलिस व महामार्ग पोलिस दिवसभर वाहतूक सुरळीत होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र, रस्त्यावरील वाढत जाणारे ट्रॅफिक कसे कमी करणार हा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर उभा राहिला होता.
महामार्गावरील सातारा व पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक दिवसभर व रात्री उशिरापर्यंत धिम्या गतीने सुरू राहिली. या वाहतूक कोंडीचा सामना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व खासदार श्रीनिवास पाटील यांनाही सहन करावा लागला. मंत्री देसाई हे वाहतूक कोंडीचा सामना करत पुण्याकडे रवाना झाले. खा. श्रीनिवास पाटील यांनी वाहतूक कोंडीपाहून रहिमतपूर येथे थांबणे पसंद केले. दरम्यान, वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन ही वाहतूक बोगद्यामार्गे वळवली. सकाळी सव्वाआठ वाजल्यापासून ही वाहतूक वळविण्यात आली. यामुळे सातार्याहून पुण्याकडे येणार्या ‘एस’ वळणावर सध्या दोन्हीही बाजूने वाहतूक सुरू झाली. घाटात बंद पडलेला कंटनेर बाजूला करण्यासाठी पोलीस घटनास्थळावर थांबून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, मशिन घेऊन कोल्हापूरकडे 70 टायरचा बंद कंटेनर दिवसभर मेकनिकल न आल्याने घाटात तसाच उभा राहिला. खंबाटकी बोगद्यात दुपारी टेम्पो बंद पडला होता. येथे महामार्ग पोलिसांनी हा टेम्पो बोगद्यातून बाहेर काढला. मात्र, सलग सुट्ट्या असल्याने सुरूरपर्यंत (ता. वाई) वाहतुकीच्या रांगा लागल्या. शनिवार व रविवार तसेच होळी, धुलीवंदन सुट्ट्या असल्याने आज दिवसभर रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होती. परिणामी वाहतूक कोंडीचा तिढा दिवसभर सुटला नाही. यामुळे वाहनचालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
COMMENTS